Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, December 19, 2022

धसका न्यूज नेटवर्क चे उपसंपादक राम हुंडारे आदर्श पत्रकार पुरस्काराने  सन्मानित 💐💐💐💐💐💐💐💐

 पत्रकारिता एक वसा ध्यास समजून समाजातील तळागाळातील तसेच सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी आपल्या लेखणीतून उपेक्षित समाजाचे प्रश्न प्रशासन दरबारात मांडून वंचित पिढीत घटकाला न्याय देण्याचा नेहमीच प्रयत्न करणारे त्याच बरोबर राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेऊन राज्यसरकार कडे निवेदन पत्रव्यवहार व रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहर अध्यक्ष व धसका न्यूज नेटवर्क उप संपादक राम हुंडारे यांना आदर्श पत्रकार म्हणून नुकताच पुरस्कार मिळाला आहे संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशिय संस्था महूद (महाराष्ट्र ) वतीने राम हुंडारे यांना संत श्री 108 गुरुदीपगिरी जीमहाराज (चेअरमन बेगमपुरा युनिव्हसिर्टी पठाणकोट पंजाब) यांच्या शुभहस्ते शाल सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला 8 डिसेंबर रोजी भुईंज ता माढा येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला असून या कार्यक्रमास संत श्री 108 निरंजनदास महाराज (अध्यक्ष संत रोहिदास महाराज जन्मस्थान पब्लिक चारिटेबल ट्रस्ट ) संत श्री 108 सात्विनंदर सिंग हिराजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा घेण्यात आला या कार्यक्रम चे आयोजन श्री राजाभाऊ शिंदे व श्री गणेश कांबळे यांनी केले होते पत्रकार सुरक्षा समितीचे शहराध्यक्ष राम हुंडारे यांना आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कार मिळाल्याने पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार राज्यसचिव डॉक्टर आशिष कुमार सुना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे उपाध्यक्ष बळीराम पवार कार्याध्यक्ष आप्पासाहेब करचे सोलापूर जिल्हा संघटक दत्तात्रय पवार जिल्हा अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार जिल्हाध्यक्ष महिला विभाग सुवर्णाताई सुना ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज जैन परभणी जिल्हा अध्यक्ष नागेश नागठाणे यवतमाळ जिल्हाध्यक्ष राम राठोड सोलापूर जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष सादिक शेख जिल्हा संपर्कप्रमुख कादर शेख शहर संघटक श्रीकांत कोळी शहर कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी शहर कार्याध्यक्ष महिला विभाग डॉ अलका सोरटे शहर प्रसिद्धीप्रमुख अक्षय बबलाद यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी साप्ताहिक यशसंघर्ष चे विभागीय उपसंपादक विजय चव्हाण सह अनेक मान्यवर उपस्थित होते. 



No comments:

Post a Comment