Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Wednesday, November 25, 2026

SARA NEWS NETWORK

सारा न्यूज नेटवर्क - 



 पत्रकार सुरक्षा समितीचा 10 वा वर्धापन दिन व राज्यस्तरीय पुरस्कार कार्यक्रम 05 डिसेंबर ला :

अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती -प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार 


सोलापूर (प्रतिनिधी ) :- गेल्या नऊ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक पणे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकार कडे पत्र व्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून आजपर्यंत ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना घरकुल योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता व जाहिराती साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांचे वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास पत्रकारांच्या चार चाकी वाहनाला टोल मधून मुक्ती ग्रामीण भागातील पत्रकारांना पत्रकारिता बरोबर पूरक व्यवसाय करता यावा म्हणून पाच लाख रुपयांचे कर्ज मिळणे त्याच बरोबर पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण यासह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती अत्यंत प्रभावी पणे काम करत असून पत्रकारांच्या मूलभूत प्रश्ना बरोबर सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारिता केली असून पत्रकार सुरक्षा समिती चा 10 वा वर्धापन दिन बरोबर समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने शनिवार दिनांक 5 डिसेंबर रोजी  समाज कल्याण केंद्र सोलापूर येथे सकाळी 11 वाजता  समाज कल्याण केंद्र सोलापूर या ठिकाणी सन्मान पत्र सन्मान चिन्ह शाल व पुष्पगुछ देऊन विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार केला जाणार आहे यामध्ये  आदर्श पत्रकार आदर्श शिक्षक उद्योग रत्न आदर्श कुटुंब प्रमुख जीवन गौरव 

इत्यादी क्षेत्रातील व्यक्तीचा समावेश असणार असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख सोलापूर जिल्हा अध्यक्ष डॉ राम हुंडारे शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment