सारा न्यूज नेटवर्क -
लोकनेते स्व. उमाकांत राठोड यांच्या १० व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन;
महा आरोग्य शिबिराचे आयोजन..
मुळेगाव तांडा / दक्षिण सोलापूर :
लोकनेते स्व. उमाकांत राठोड साहेब (मुळेगाव तांडा), माजी सभापती, दक्षिण सोलापूर पंचायत समिती यांच्या १० व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
आपल्या तांड्याचा, प्रभागाचा व पर्यायाने दक्षिण सोलापूर तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी आयुष्यभर परिश्रम घेतले. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी ते नेहमीच अग्रभागी राहिले. त्यांच्या कार्याची आठवण आजही तांड्यातील व तालुक्यातील जनतेच्या मनात जिवंत आहे.
स्व. उमाकांत राठोड साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ तांड्यातील व परिसरातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी शक्ती उच्च माध्यमिक आश्रम शाळेचे प्राचार्य श्री. रमेश राठोड सर व सर्व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी स्व. राठोड साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
स्व. साहेबांच्या स्मृतींना उजाळा देताना उपस्थितांनी त्यांच्या विकासात्मक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.



No comments:
Post a Comment