Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Monday, November 2, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



करंजखोपच्या चवणेश्वर देवाची यात्रा उत्साहात संपन्न; चांगभलेच्या गजरात गुलालाची उधळण.. 


करंजखोप (ता. उत्तर कोरेगाव, जि. सातारा) : - सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगाव तालुक्यातील करंजखोपचे जागृत ग्रामदैवत श्री चवणेश्वर देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.


सालाबादप्रमाणे अश्विन महिन्यातील चौथ्या रविवारी ही यात्रा भरते. यात्रेनिमित्त चवणेश्वर डोंगरावर आणि करंजखोप परिसरात मिठाईसह विविध दुकानांनी मोठी गर्दी केली होती. परिसर भाविकांनी गजबजून गेला होता.



गुळूंब, वरखडवाडी, रणदुलाबाद, सोनके, पिंपोडे आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी दाखल झाले होते. सायंकाळी चार वाजल्यानंतर मानाच्या काठ्यांची भेट झाल्यानंतर करंजखोप गावातून चांगभलेचा गजर करत गुलालाच्या उधळणीत देवाचा छबिना मोठ्या भक्तीभावात काढण्यात आला.


यात्रेदरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.


जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चवणेश्वर डोंगरावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


यात्रा शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

No comments:

Post a Comment