सारा न्यूज नेटवर्क -
जागेच्या वादातून दलित कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ; दोघांवर 'ॲट्रॉसिटी' अंतर्गत गुन्हा दाखल..
मंद्रुप (प्रतिनिधी) : दक्षिण सोलापूर
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे जागेच्या कारणावरून दलित कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ करत, कुऱ्हाडीने मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंद्रुप पोलिसांनी वाघेश महादेव म्हेत्रे आणि रवि महादेव म्हेत्रे दोघे रा. मंद्रुप, ता. दक्षिण सोलापूर या दोन भावांविरुद्ध अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र आडवेप्पा कांबळे (वय ३३, रा. मंद्रुप) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंद्रुप येथील बाजार चौकाजवळ रस्त्यालगत फिर्यादीचे आजोबा मल्लप्पा येगप्पा कांबळे यांच्या नावे एक जागा आहे. ही जागा वारसा हक्काने रवींद्र कांबळे यांचे वडील आणि काकांच्या नावावर असून ग्रामपंचायतीमध्ये तिचा मिळकत क्रमांक १५७३ असा आहे.
१५ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास रवींद्र कांबळे हे त्यांचे काका आणि चुलत भावासोबत या जागेची साफसफाई करत होते. त्याच वेळी आरोपी वाघेश म्हेत्रे आणि रवि म्हेत्रे हे दोघे दुचाकीवरून तेथे आले. "ही जागा आमची आहे," असे म्हणत त्यांनी कांबळे कुटुंबाला साफसफाईचे काम करण्यास मज्जाव केला.
फिर्यादी आणि त्यांचे कुटुंब हे अनुसूचित जातीतील (मांग) असल्याचे माहीत असूनही आरोपींनी त्यांना लक्ष्य केले. "तुम्ही मांग जातीचे आहात, तुम्हाला एवढी मस्ती आली आहे काय? तुम्हाला एकेकाला कुऱ्हाडीने कापून मारेन, तुम्हाला काय करायचे ते करून घ्या," अशी अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरत त्यांनी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकारानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर रवींद्र कांबळे यांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार नोंदवली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, सुरज जगताप करत आहेत.

No comments:
Post a Comment