सारा न्यूज नेटवर्क -
बोलक्या हातांनी उजळल्या दिवाळीच्या पणत्या..!
ममता मूकबधिर विद्यालयात दिवाळी पणती, आकाश कंदील व मोतीकामाचे प्रशिक्षण संपन्न..
सोलापूर : - एन.ए.बी. संचलित ममता मूकबधिर विद्यालयात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी सणाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी विशेष कौशल्य प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेचे कलाशिक्षक नरेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्णबधिर विद्यार्थ्यांना पणती रंगकाम, आकाश कंदील तयार करणे, तसेच रंग व मोतीकामाचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत सुंदर व आकर्षक पणत्या आणि आकाश कंदील तयार केले आहेत.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या वस्तूंची विक्री सध्या शाळेच्या परिसरात सुरू असून, नागरिकांनी व पालकांनी या वस्तू खरेदी करून कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यावे व त्यांचे कौतुक करावे, असे आवाहन संस्थेचे सचिव शशीभूषण यलगुलवार, मुख्याध्यापिका संगीता गायकवाड, तसेच शिक्षिका मेधा जोशी आणि तेजश्री श्रीरेखम यांनी केले आहे.



No comments:
Post a Comment