सारा न्यूज नेटवर्क -
पुणे विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत विराट स्पोर्टस अकॅडमीला 15 पदके..
पुणे :- भोसरी पुणे येथील श्री.संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल येथे दि.30 व 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत पुणे विभागीय मैदानी स्पर्धा संपन्न झाल्या...
या स्पर्धेत नेहरूनगर येथील विराट स्पोर्ट्स अकॅडमीने 15 पदकांची कमाई केली...
यामधून 7 खेळाडूंची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे...
या सर्व यशस्वी खेळाडूंना एन.आय.एस. कोच सूर्याजी लिंगडे व एन.आय.एस. कोच भारती लिंगडे यांचे मार्गदर्शन लाभले...
या सर्व खेळाडूंचे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या...
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा मार्गदर्शक सुभाष माने , क्रीडा पत्रकार अजित संगवे , क्रीडा प्रकोष्ट यशवंत पाथरूट , रेल्वे अधिकारी निलेश वरवडकर , बार असोसिएशनचे पदाधिकारी संतोष पाटील, संतोष कदम व सिद्धू बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते..


No comments:
Post a Comment