सारा न्यूज नेटवर्क -
मंद्रूप पोलिसांची मोठी कारवाई;
टाकळी रस्त्यावर बलेनो कारसह साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त, दारू तस्कराला अटक..
प्रतिनिधी:दक्षिण सोलापूर
मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी रात्रीच्या सुमारास मोठी कारवाई करत एका बेकायदेशीर दारू तस्कराला रंगेहात पकडले आहे. १३ मैल ते टाकळी रस्त्यावर केलेल्या या कारवाईत पोलिसांनी बलेनो कार, विविध कंपन्यांची विदेशी दारू, मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण ७,६३,६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
शेखर गुरबाळाप्पा बगले वय ३५, रा. टाकळी, ता. दक्षिण सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
बुधवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास मौजे १३ मैल ते टाकळी दरम्यान पोलिसांनी संशयास्पद बलेनो कार MH 13 EK 4918 थांबवून तिची झडती घेतली. यावेळी कारमध्ये कोणत्याही परवान्याशिवाय विक्रीसाठी घेऊन चाललेला मोठ्या प्रमाणावर विदेशी दारू आणि बिअरचा साठा आढळून आला.
बलेनो कार किंमत ७,००,००० रुपये वापरती
बिअर व विदेशी दारू एकूण ३२,६२० रुपयांचा साठा यात टुबर्ग बिअरच्या ४८ बाटल्या, रॉयल स्टॅगचे ४० क्वार्टर, इम्पेरियल ब्लूचे ४२ क्वार्टर, किंगफिशरचे २४ टीन आणि ब्लेंडर्स प्राईडचे १३ क्वार्टर जप्त करण्यात आले.
मोबाईल २५,००० रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल.
रोख रक्कम आरोपीच्या ताब्यातून १,००० रुपये रोख ५०० च्या २ नोटा.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश जगन्नाथ पाटील वय ३६ यांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कलम ६५ (ई) आणि ६५ (अ) अंतर्गत गुन्हा (गु.र.नं. ४२०/2026) दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई मंद्रूप पोलीस ठाण्याचे परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गुरव करत आहेत.



No comments:
Post a Comment