Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Monday, September 28, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



10 वर्षांची अविरत रक्तदानाची परंपरा, माणुसकीचा अखंड वारसा - डॉ.सूर्यप्रकाश कोठे 

सिद्धेश्वर पांडगळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मा. सिद्धेश्वरजी पांडगळे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


10 वर्षांची अविरत रक्तदानाची परंपरा कायम ठेवत यंदाही मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, भव्य रक्तदान शिबिर आणि महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी एस.टी. पास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


या सामाजिक उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 10 वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेली रक्तदानाची परंपरा. डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेला हा माणुसकीचा वारसा आजही अविरतपणे सुरू आहे.




यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून -

डॉ. जयप्रकाश कोठे, एमआयएम जिल्हाप्रमुख शौकत पठाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस शशिकांत बापू कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.


याप्रसंगी संस्थेचे संस्थापक समीर पांडगळे, अध्यक्ष यश चंदनशिवे यांच्यासह शेखर बडगगेरी, महादेव गायकवाड, महादेव तोरणे, राहुल कडलाख, दयानंद बाळशंकर, सागर थोरात, पप्पू कांबळे, अविनाश चंदनशिवे, संतोष बाळशंकर, रोहित गायकवाड, टायगर पांडगळे, सोन्या किरतकुडवे, सचिन तोरणे, विशाल मोरे, सचिन बडगेरी, योगेश शिंदे, मंगेश पांडगळे, निकेतन बनसोडे, पृथ्वीराज बाळशंकर, अस्लम शेख, आकाश बनसोडे, अनिकेत रेड्डी, धनराज मस्के, महेश आडगळे, राजू सुरवसे, धनराज रेड्डी, सुजित राजगुरू आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ सत्कार न घेता सामाजिक कार्यातून वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श यातून निर्माण करण्यात आला आहे.




No comments:

Post a Comment