Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Monday, September 28, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



मंद्रूपमध्ये उद्या (मंगळवार) मोफत हृदय तपासणी शिबिर; ईसीजी, रक्तदाब आणि शुगरची होणार मोफत तपासणी.!


प्रतिनिधी : दक्षिण सोलापूर 

बदलती जीवनशैली आणि वाढत्या ताणतणावामुळे आजकाल हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर, जागतिक हृदय दिनानिमित्त नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी मंद्रूपमध्ये एका विशेष मोफत आरोग्य तपासणी आणि जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


वार.मंगळवार, दि.२९ सप्टेंबर रोजी सकाळी ९:०० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत.

ठिकाण:कोरे पेट्रोल पम्प समोर डी. एस. कमळे गुरुजी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, मंद्रूप.




हे शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र कंदलगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, प्राथमिक आरोग्य केंद्र (कंदलगाव) आणि डी. एस. कमळे गुरुजी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट (मंद्रूप) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.


*या शिबिरात मिळणाऱ्या मोफत सुविधा!*


नागरिकांची ईसीजी (ECG), रक्तदाब (BP) आणि रक्तातील साखर (Diabetes/BSL) यांची मोफत तपासणी केली जाईल.

हृदयविकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाबापासून स्वतःचा बचाव कसा करावा? यासाठी योग्य आहार आणि व्यायामाचे महत्त्व डॉ. शरद जाधव समजावून सांगतील.


आपत्कालीन परिस्थितीत एखाद्याचा जीव कसा वाचवायचा, याचे प्रात्यक्षिकासह BLS (Basic Life Support) प्रशिक्षणही दिले जाणार आहे.



*नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना:*

तपासणीसाठी येताना नागरिकांनी आपले जुने वैद्यकीय रिपोर्ट, ईसीजी अहवाल आणि सध्या सुरू असलेल्या औषधांची चिठ्ठी (Prescription) सोबत आणावी. शुगर तपासणी अचूक होण्यासाठी शक्यतो सकाळी उपाशीपोटी यावे. मात्र, आपली नियमित औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.


मंद्रूप आणि आसपासच्या गावांतील नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या आरोग्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन डी. एस. कमळे गुरुजी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे संचालक अभिजीत जवळकोटे यांनी केले आहे.

आपले हृदय सुदृढ ठेवा, शिबिराला नक्की भेट द्या.!




No comments:

Post a Comment