Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Friday, October 2, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



सोलापूर मनपाच्या सिटी बसचा बोजवारा;

15 दिवस झाले ई-बस येऊन, तरी रस्त्यावर जुन्याच लालपऱ्या आणि त्या पण बंद..!

सोलापूर (प्रतिनिधी) :- “लालपरी पुन्हा रस्त्यातच लाल! सोलापूर मनपाची सिटी बस बंद पडल्याने विद्यार्थी-नोकरदारांची तारांबळ; इलेक्ट्रिक बस धूळ खातायत, मग प्रवाशांचा प्रवास कधी सुधारणार?”सोलापूरकरांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही रोजच्या जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. मात्र, हीच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे… आणि कारण आहे भर रस्त्यात बंद पडलेली सिटी बस!

सोलापूर शहरातील बळीवेस ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर धावणारी महानगरपालिकेची सिटी बस चक्क रस्त्याच्या मधोमध बंद पडली.

बस बंद पडल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. विशेषतः विद्यार्थी, कामगार, नोकरदार आणि रोजच्या प्रवासासाठी बसवर अवलंबून असलेल्या नागरिकांची चांगलीच गोची झाली.एका बाजूला शहरातील नागरिकांना वेळेवर आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक हवी आहे…आणि दुसऱ्या बाजूला जुन्या बसच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न वारंवार समोर येताना दिसत आहे.प्रश्न फक्त एका बसचा नाही… प्रश्न आहे तो सोलापूरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनाचा!भर रस्त्यात बस बंद पडली की केवळ वाहतूक विस्कळीत होत नाही, तर त्या बसमधील प्रवाशांच्या वेळेचाही खोळंबा होतो. विद्यार्थ्यांना कॉलेजला पोहोचण्यास उशीर होऊ शकतो, कामगारांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब होऊ शकतो आणि नोकरदारांचा रोजचा प्रवास अक्षरशः वेळेशी सुरू असतो.मग या प्रवाशांच्या वेळेची आणि गैरसोयीची जबाबदारी नेमकी कोणाची?सोलापूर शहरात इलेक्ट्रिक बस दाखल झाल्याची माहिती आहे. या बस सुरू झाल्यामुळे जुन्या बसवरील ताण कमी होईल आणि प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.मात्र, या इलेक्ट्रिक बस प्रत्यक्ष प्रवासी सेवेत कधी येणार, हा प्रश्न सध्या नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.सोमवारपासून इलेक्ट्रिक बस सुरू होणार असल्याचे सांगितले जात असले, तरी त्या प्रत्यक्ष रस्त्यावर कधी धावतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.इलेक्ट्रिक बस शहरात दाखल होऊन जवळपास १५ दिवस झाले असतील, तर त्या बस अद्याप पूर्ण क्षमतेने सेवेत का नाहीत?त्यांची बॅटरी, चार्जिंग व्यवस्था, तांत्रिक तपासणी, परवानग्या आणि इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत का?आणि सर्वात महत्त्वाचा पप्रश्न?बस उभ्या ठेवून बॅटरीच्या क्षमतेवर किंवा वाहनांच्या देखभालीवर काही परिणाम होत आहे का?हा प्रश्न आम्ही आरोप म्हणून नव्हे, तर संबंधित प्रशासनाने नागरिकांसमोर स्पष्ट करावा, अशी अपेक्षा म्हणून उपस्थित करत आहोत.




सोलापूरकरांना मोठमोठी आश्वासने नकोत. त्यांना हवी आहे—वेळेवर येणारी बस…

रस्त्यात बंद न पडणारी बस…

सुरक्षित प्रवास…

आणि विद्यार्थ्यांपासून कामगारांपर्यंत प्रत्येकासाठी विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक!आज एक बस बंद पडली आहे; उद्या दुसरी बस बंद पडू नये, यासाठी प्रशासनाने काय नियोजन केले आहे?जुन्या बसची नियमित सर्व्हिसिंग होते का?

बस रस्त्यावर पाठवण्यापूर्वी तिची तांत्रिक तपासणी केली जाते का?आणि नव्या इलेक्ट्रिक बसचा वापर सुरू करताना कोणते नियोजन केले आहे?

या सर्व प्रश्नांची उत्तरं आता सोलापूरकरांना मिळायला हवीत.एकीकडे शहर आधुनिकतेकडे वाटचाल करत असल्याचे चित्र दाखवले जाते… इलेक्ट्रिक बस शहरात येतात… आणि दुसरीकडे लालपरी भर रस्त्यात बंद पडते!म्हणूनच सोलापूरकरांचा सरळ सवाल आहे “इलेक्ट्रिक बस कागदावर आणि लालपरी रस्त्यात बंद… मग सोलापूरकरांचा प्रवास सुधारणार तरी कधी?”महानगरपालिकेने केवळ नवीन बस दाखल करण्यापेक्षा त्या प्रत्यक्षात किती बस सेवा देत आहेत, किती फेऱ्या होत आहेत, बसची देखभाल कशी होते आणि प्रवाशांना वेळेवर सेवा कशी मिळेल, याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

कारण…सार्वजनिक वाहतूक ही केवळ बस नसते…

ती हजारो सोलापूरकरांच्या रोजच्या आयुष्याची गती असते!आणि हीच गती जर भर रस्त्यात थांबत असेल, तर जबाबदारीने कारण शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाय करण्याची वेळ आता आली आहे.




No comments:

Post a Comment