सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर - कोणापुरे चाळ येथे आयुष्मान आरोग्य शिबिर व टीबी रुग्णांना फूड बास्केट किट वाटप
सोलापूर : कोणापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वतीने आयुष्मान आरोग्य शिबिर व टीबी रुग्णांना फूड बास्केट किट वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने मॅडम यांच्या आदेशानुसार व प्रभाग क्रमांक 15 च्या नगरसेविका मा. श्रीदेवी ताई फुलारे यांच्या सहकार्याने कोणापुरे चाळ UHWC अंतर्गत दि. 30 सप्टेंबर 2026 रोजी कोणापुरे चाळ येथील रोकडा मारुती मंदिर येथील सभागृहात प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान-2 व 100 Days TB Free भारत अभियान-2 अंतर्गत आयुष्मान बाह्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
हे शिबिर वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लोलू सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. शिबिरात एकूण 77 रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधोपचार देण्यात आले. तसेच NCD अंतर्गत उच्च रक्तदाब (HTN), मधुमेह (DM) व थायरॉईड रुग्णांची तपासणी करून औषधोपचार देण्यात आले. रुग्णांना संतुलित आहार, योग्य निद्रा, नियमित व्यायाम, योगा आणि मानसिक तणावमुक्त जीवन जगण्यासाठी वैद्यकीय समुपदेशन करण्यात आले.
यानंतर लाल बावटा कामगार नेते मा. रंगप्पा मरेड्डी यांच्या संपर्क कार्यालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लोलू वाय. एच., ज्येष्ठ नेते मा. रंगप्पा मरेड्डी, नागनाथ म्हेत्रे, तसेच कोणापुरे चाळीतील श्री जांबमुनी मोची समाजाचे पदाधिकारी मा. शंकर म्यागेरी व सुशीलकुमार म्हेत्रे यांच्या हस्ते टीबी बाधित रुग्णांना फूड बास्केट किटचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी MO डॉ. पल्लोलू, स्टाफ नर्स श्रीमती सिद्दीकी, MPW मोईन शेख, ANM संगीता सावंत, TB HV मा. दीपक म्हेत्रे, क्ष-किरण तंत्रज्ञ दुर्गेश कुमावत, अभिषेक रोकडे, अनिकेत लोखंडे, विश्वनाथ कोठे, सौ. सपना जाधव, सॅनिटेशन वर्कर, तसेच आशा आरोग्य सेविका चंद्रकला सोनवणे, अश्विनी भालशंकर व वैजयंती कांबळे यांनी परिश्रम घेतले.






No comments:
Post a Comment