सारा न्यूज नेटवर्क -
चेअरमन महेश इंगळे यांनी पदभार स्वीकारल्यापासून मंदिर व्यवस्थापनात आमूलाग्र बदल झाला - न्यायमूर्ती नीरज धोटे
(अक्कलकोट प्रतिनीधी दि ०२/१०/२६)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश मालक इंगळे यांनी पदभार स्वीकारल्यापासून मंदिर व्यवस्थापनात आमूलाग्र बदल झाला असल्याचे मनोगत मुंबई उच्च न्यायालय, कोल्हापूर खंडपीठाचे माननीय न्यायमूर्ती नीरज धोटे साहेब यांनी व्यक्त केले.
आज श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे सहकुटूंब येऊन न्यायमूर्ती नीरज धोटे साहेब यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने चेअरमन महेश मालक इंगळे यांनी स्वामींचा प्रसाद, कृपावस्त्र आणि प्रतिमा देऊन न्यायमूर्ती नीरज धोटे साहेब यांचा सत्कार केला. यावेळी न्यायमूर्ती नीरज धोटे साहेब बोलत होते. पुढे बोलताना न्यायमूर्ती नीरज धोटे साहेब म्हणाले की श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेणे हा नेहमीच एक दिव्य अनुभव असतो. अक्कलकोट नगरीत पाऊल ठेवलं की मनातील सगळी चिंता दूर होते. स्वामींचा आशीर्वाद हाच आमच्या कार्याची खरी शक्ती आहे. भाविकांसाठी दर्शन रांग, स्वच्छता, भक्त निवास, महाप्रसाद आणि सुरक्षेच्या दृष्टीने जी उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे, ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. लाखो भाविक दररोज येत असतानाही कुठेही गोंधळ नाही, हे नियोजनबद्ध व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण आहे. महेश मालक आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन. स्वामींची सेवा अशीच अविरत घडो, हीच स्वामी चरणी प्रार्थना असल्याचे मनोगत ही व्यक्त केले.
यावेळी अक्कलकोट न्यायालयाचे न्यायमुर्ती शेख मॅडम, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, स्वप्निल मोरे आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.


No comments:
Post a Comment