सारा न्यूज नेटवर्क -
वन्यजीव सप्ताहानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन..
सामाजिक वनीकरण,वन विभागाचा उपक्रम..
सोलापूर, दि. १ ऑक्टोबर २०२६ :
सामाजिक वनीकरण, वन विभाग, सोलापूर यांच्या वतीने वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने कै. मातोश्री रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते-पाटील सार्वजनिक ग्रंथालय येथे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये परिसरातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून वन्यजीव, पर्यावरण, वृक्षसंवर्धन व निसर्ग संवर्धन या विषयांवर सुंदर चित्रे साकारली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्यामध्ये वन्यजीव व पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
यावेळी माझी महापौर श्रीमती लताताई फुटाणे, वनपाल सौ. रेणुका सोनटक्के तसेच श्री. राजकुमार कोळी, कर्मचारी व स्थानिक महिला यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून वन्यजीव व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले.
चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, पर्यावरणीय जाणीव आणि वन्यजीव संरक्षणाची भावना रुजविण्यासाठी अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
— सामाजिक वनीकरण, वन विभाग, सोलापूर



No comments:
Post a Comment