सारा न्यूज नेटवर्क -
माहे १ एप्रिल २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर/अवैध देशी-विदेशी मद्य / परराज्यातील मद्य / बनावट मद्य निर्मिती / विक्री व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकुण ६७२८६६ ली. रसायन, ४८६९२.५ लि. हातभट्टी दारु, ९३३८.१७ ब.लि. परराज्यातील मद्य, ३९२६.०४ ब.लि. देशी मद्य, ११६८.२ ब.लि. विदेशी मद्य, ९०७.१७ ब.ली. बिअर, २०६५८.८ ब.लि. ताडी, रिकाम्या बाटल्या ३३१४९०, बनावट बुचे १३३१६०, बनावट लेबल १५५४०० व स्पिरिट १३८०० लि. असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण १८२५ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. तसेच एकूण १९२५ जणांवर कारवाई करुन १८२ वाहनासह एकूण रुपये १०,२२,९७,७५५/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क, विभागाचे निरीक्षक श्री.जे.एन. पाटील, दुय्यम निरीक्षक श्री.राम निबाळकर, श्री. समाधान शेळके, जवान श्री. अनिल पांढरे, श्री. चेतन व्हनगुंटी, श्री. प्रशांत इंगोले, श्री. मंगेश मारसिंग, श्री. स्वप्निल अरमाळ, यांनी पार पाडली आहे.
तसेच अवैध ढाब्यावर मद्य विक्री, अवैध मद्य निर्मिती, वाहतुक, ती जवळ बाळगणे यासाठी वापरण्यात येणा-या जागा मालक यांनाही सदर कारवाईत आरोपी करण्यात येते याची नोंद घ्यावी. मिथेनॉलयुक्त बनावट दारुमुळे पुणे येथील दुर्घटनेत लोकांचे दुदेर्वी मृत्यु झाले आहे. तरी सदर प्रकारच्या विषारी दारु मुळे किडनी निकामी होणे, कामस्वरुपीचा अंधत्व येणे व अकाली मृत्यु असे गंभीर दुष्परिणाम संभवतात. तरी अश्या कुठल्याही अमिषांना बळी न पडण्याचे आव्हान नागरिकांना करण्यात येत आहे.
"आपल्या परिसरात कोठेही अवैध मद्य निर्मिती किंवा विक्री होत असल्यास अथवा मिथेनॉल, क्लोरेल हायड्रेट इत्यादी तत्सम पदार्थ, द्रव्याची निर्मिती, भेसळ, वाहतुक, विक्री होत असल्यास त्याची माहिती टोल फ्री १८००२३३९९९९ क्रमांक अथवा व्हॉटस अॅप क्रमांक ८४२२००११३३ या क्रमांकावर तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाला द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे श्रीमती भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापुर यांनी सांगुन अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.


No comments:
Post a Comment