Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Tuesday, November 3, 2026

SARA NEWS NETWORK

सारा न्यूज नेटवर्क - 



 पत्रकार सुरक्षा समिती साजरी करणार वंचिता बरोबर दिवाळी, 

गेल्या नऊ वर्षांपासूनची अखंडित परंपरा अंध अपंगाना देणार गोड फराळ -प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार 


सोलापूर (प्रतिनिधी ) :- गेल्या नऊ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक पणे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकार कडे पत्र व्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून आजपर्यंत ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना घरकुल योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता व जाहिराती साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांचे वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास पत्रकारांच्या चार चाकी वाहनाला टोल मधून मुक्ती ग्रामीण भागातील पत्रकारांना पत्रकारिता बरोबर पूरक व्यवसाय करता यावा म्हणून पाच लाख रुपयांचे कर्ज मिळणे त्याच बरोबर पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण यासह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती अत्यंत प्रभावी पणे काम करत असून पत्रकारिता बरोबर सामाजिक बांधिलकी जपत पत्रकार सुरक्षा समिती दर वर्षी दिवाळीत सोलापूर शहरातील अंध अपंग गोरगरीब गरजू लोकांना दिवाळी चा गोड फराळ वाटप करत वंचित लोकांबरोबर दिवाळी साजरी करत असते गेल्या नऊ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती ने ही परंपरा अखंडीत ठेवली असून पत्रकारिता बरोबर सामाजिक भान जपत पत्रकार सुरक्षा समिती हा अभिनव उपक्रम राबवत असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment