सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूरकरांसाठी दिलासा.!
प्राधान्य कुटुंबांना 5 किलो, अंत्योदयला 35 किलो मोफत धान्य - अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे
सोलापूर (प्रतिनिधी ) :- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब - लाभार्थी योजनेतील पात्र लाभार्थ्यांना डिसेंबरसाठी नियमित अन्नधान्याचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. - यासाठी सोलापूर शहरातील रास्तभाव धान्य दुकानांसाठी अन्नधान्याचे मासिक नियतन मंजूर करण्यात आले असून,
लाभार्थ्यांना विहित परिमाणानुसार धान्य वितरित करण्याचे निर्देश अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी दिले आहेत.
अन्न अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिकार्ड ३५ किलो, तर प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती पाच किलो अन्नधान्य मोफत देण्यात येणार आहे. यामध्ये अंत्योदय लाभार्थ्यांना प्रतिकार्ड २२ किलो तांदूळ व १३ किलो गहू, तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती तीन किलो तांदूळ व दोन किलो गहू वितरित करण्यात येणार आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पारदर्शकता राखण्यासाठी आधार संलग्न ई-पॉस मशीनद्वारेच अन्नधान्याचे वितरण करणे बंधनकारक असल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी दिली आहे.


No comments:
Post a Comment