सारा न्यूज नेटवर्क -
श्री दिगंबर मुनीनाथ भजनी मंडळाच्या वतीने श्रीशैल पादयात्रे करून अन्नदान..
सोलापूर :- दिनांक २२/२/२०२६*श्री दिगंबर मुनीनाथ भजनी मंडळाच्या वतीने सोलापूर ते श्रीशैल जाणाऱ्या पादयात्रे करुना अन्नदान सेवा करण्यात आले.
श्री मार्कंडे श्रीशैल पदयात्रा दिंडी संस्थेच्या सोलापूर ते श्रीशेल पदयात्रा दिंडी दि.२२ फेब्रुवारी रोजी प्रारंभ झाला सदर पदयात्रा दिंडी कुंभारी येथील मासाहेब बिडी कामगार घरकुल वसाहतीत रात्री ८ वाजता आल्यानंतर पालखीचे महापूजा व महाआरती श्री दिगंबर मुनिनाथ भजनी मंडळाचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी(महाराज)यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
त्यानंतर श्री मार्कंडेय श्रीशैल दिंडी संस्थेचे वेणुगोपाल सकीनाल ,राजय्या मासन, जगन्नाथ भंडारी,सत्यनारायण गालपल्ली,प्रभाकर गालपल्ली, दत्तात्रय येरवा यांचे स्वागत श्रीनिवास चिलवेरी नागनाथ कारमपुरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पदयात्रा दिंडीत सामील झालेल्या सर्व भाविक भक्तांना अन्नदान(महाप्रसाद) वाटप करण्यात आले त्यानंतर रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत ओम नमः शिवाय भजनाचा कार्यक्रम करण्यात आला आणि पहाटे 4 वाजता काकडा आरती करून चहापाणी नंतर सर्व पादयात्रे करू दिंडी श्रीशैल यात्रेला प्रयाण झाले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री मार्कंडेय श्रीशैल दिंडी यात्रेचे पालखी प्रमुख गेनिनाथ आडम, नागेश पुकाळे, सिद्धाराम पोगुल श्रीनिवास शेलार,पवन पेंटा विश्वनाथ कैंची श्री दिगंबर मुनिनाथ भजनी मंडळाचे अडवोकेट मुनिनाथ कारमपुरी विक्रम कारमपुरी, विशाल चिलवेरी, नरेश अनालदास, प्रशांत जक्का, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, अक्षय चिलवेरी, रेखा आडकी,भाग्यलक्ष्मी त्रिमल,रेणुका मच्छा, सुनंदा लोडल,अंबिका तिरंदास,उमा कोंडा, आदींनी विशेष परिश्रम घेतले श्रीशैल पदयात्रा दिंडी सोहळा व महाप्रसाद कार्यक्रमास हजारो भाविक भक्त बंधू भगिनी उपस्थित होते श्रीशैल पदयात्रा दिंडी सोहळ्यामुळे संपूर्ण विडी कामगार घरकुल वसाहतीत भक्तीमय वातावरणात निर्माण झाले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment