सारा न्यूज नेटवर्क -
दैनिक तुफान क्रांती संपादक मिर्झा गालिब मुजावर यांचा सत्कार..
सोलापूर (प्रतिनिधी ) :- गेल्या नऊ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक पणे आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकार कडे पत्र व्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून आजपर्यंत ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना घरकुल योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता व जाहिराती साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांचे वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास पत्रकारांच्या चार चाकी वाहनाला टोल मधून मुक्ती ग्रामीण भागातील पत्रकारांना पत्रकारिता बरोबर पूरक व्यवसाय करता यावा म्हणून पाच लाख रुपयांचे कर्ज मिळणे त्याच बरोबर पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण यासह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती अत्यंत प्रभावी पणे काम करत असून पत्रकारांच्या मूलभूत प्रश्ना एक बरोबर सामाजिक बांधिलकी जपत समाजातील वंचित पिढीत अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी देखील पत्रकार सुरक्षा समिती वतीने जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त महानगर पालिका आयुक्त यांना देखील भेटून निवेदन सादर करत आहे
पत्रकार सुरक्षा समितीच्या पश्चिम महाराष्ट्र संघटक पदी सांगोला येथील दैनिक तुफान क्रांती चे संपादक मिर्झा गालिब मुजावर यांची पत्रकार सुरक्षा समितीच्या पश्चिम महाराष्ट्र संघटक पदी कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी नियुक्ती केली होती त्यांचा सांगोला येथील कार्यालयात प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र ओळख पत्र व शाल घालून सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहर प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी बबन चव्हाण तन्वीर मुजावर उपस्थित होते.
*मिर्झा गालिब मुजावर यांचा अल्प परिचय*
मिर्झा गालिब मुजावर हे मांजरी ता. सांगोला येथील रहिवाशी असून त्यांना लहानपणापासून पत्रकारिताची आवडव आकर्षण होते समाजातील अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त त्याच बरोबर वंचित पीडित घटकाच्या न्याय हक्कासाठी आपण लढलं पाहिजे ही भूमिका असल्याने मिर्झा गालिब मुजावर यांनी दैनिक तुफान क्रांती नावाचे वृत्तपत्र सुरु केले असून संपादक पदाची जबाबदारी अनेक वर्षांपासून ते इमानइतबारे यशस्वीरित्या पार पाडत आहेत. सांगोला तालुक्यातील विविध विषयावर ते दैनिक तुफान क्रांती वृत्तपत्रातून लेखन करत असून तळागाळाचे प्रश्न शासन दरबारात मांडून त्यांना न्याय देण्याची भूमिका पार पाडत आहेत. त्यांनी वृत्तपत्र चळवळ जिवंत ठेवली असून सांगोला तालुकासह महाराष्ट्र राज्यात दैनिक तुफान क्रांती ने बहुसंख्य वाचक वर्ग निर्माण करून आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे दैनिक तुफान क्रांती चे संपादक मिर्झा गालिब मुजावर यांची पत्रकार सुरक्षा समितीच्या पश्चिम महाराष्ट्र संघटक पदी निवड झाल्याने पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पत्रकारांच्या प्रश्नाची जाणीव असलेल्या संपादकांची निवड केल्याने पश्चिम महाराष्ट्र मधील पत्रकारांचे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा पत्रकारांनी व्यक्त केली असून मिर्झा गालिब मुजावर यांचे विशेष अभिनंदन करून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला जात आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment