सारा न्यूज नेटवर्क -
उपमहापौर सौ.ज्ञानेश्वरी महेश देवकर यांची गिरीजाबाई शेटे नगर परिसरात सदिच्छा भेट.
स्थानिक नागरिकांशी साधला संवाद..
सोलापूर : - सौ ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी आज गिरीजाबाई शेटे परिसरात सदिच्छा भेट देत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.
या भेटीदरम्यान त्यांच्या समवेत भारतीय जनता पार्टी दक्षिण विभागाचे मंडळ अध्यक्ष महेश देवकर तसेच स्वामिनी फाऊंडेशन च्या संस्थापिका अध्यक्षा दिपाली शेटे उपस्थित होत्या.
शेटे नगर येथील श्री. अविनाश पवार यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्री. सुनील जाधव, श्री. संतोष वानखेडे, चौगुले साहेब, श्री. अमित खरटमल, श्री. संदीप खेडकर, श्री. सागर लोंढे, श्री. सुशील गायकवाड, श्री. सुनिल कामनास, श्री. प्रदीप डोईजोडे, श्री. शिवराज शिंदे, श्री. शिंटो सर, श्री. राज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी मा. उपमहापौर, सौ ज्ञानेश्वरी महेश देवकर व सौ. दिपाली शेटे मॅडम यांचा सत्कार सौ. संगीता पवार, सौ. दिपाली जाधव व श्री. वानखेडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
भेटी दरम्यान शेटे नगर परिसराची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. स्थानिक नागरिकांशी संवाद साधत पाणी, स्वच्छता, रस्ते व इतर मूलभूत सुविधांबाबत चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या तातडीने मार्गी लावण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन उपमहापौरांनी दिले.
या सदिच्छा भेटीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे




No comments:
Post a Comment