सारा न्यूज नेटवर्क -
पत्रकार सुरक्षा समितीचे मनोज गायकवाड यांचा सोलापूर येथे सत्कार
जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे यांच्या हस्ते सत्कार संपन्न..
सोलापूर (प्रतिनिधी ):- गेल्या नऊ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक पणे आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकारकडे पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याच्या प्रयत्न करत आहे. पत्रकार सुरक्षा समिती फलटण तालुका अध्यक्ष पदी कार्यसम्राट न्यूज चे फलटण तालुका प्रतिनिधी मनोज गायकवाड यांची नियुक्ती कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी केली होती.
युवा पत्रकार मनोज गायकवाड यांचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने सोलापूर येथे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र ओळख पत्र शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख सातारा जिल्हा अध्यक्ष विक्रम वाघमारे सोलापूर शहर प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी चैतन्य कांबळे महेश मेटकरी इम्रान आत्तार मुज्जमील काखंडकीकर दैनिक अबतक चे संपादक प्रसाद जगताप डॉ अन्वर होटगीकर यावेळी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment