सारा न्यूज नेटवर्क -
वांगीत मन्ना जुगारावर मंद्रूप पोलिसांची कारवाई;
१० जणांवर गुन्हा दाखल, रोख रकमेसह मोबाईल जप्त; ४४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत.!
प्रतिनिधी: दक्षिण सोलापूर
दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी येथे पैशांवर मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याच्या आरोपावरून मंद्रूप पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी १० जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास वांगी येथे ही कारवाई करण्यात आली. यावेळी संबंधित व्यक्ती पैशांवर मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी पिराजी दिंगबर काळे, रफिक मकबुल शेख, संदिप मलिर्काजुन तोडकरी, केराप्पा भिमा दावणे, हुसेन अहमद शेख, हुसेन सिकंदर शेख, सोमनाथ मारुती खडाखडे, अर्जुन शंकर मेनगार, राम मोहन पतुरे आणि विठ्ठल पतुरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत रोख रक्कम तसेच रेडमी, विवो आणि लावा कंपनीचे मोबाईल फोन असा एकूण ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. संबंधित आरोपींना अटक करण्यात आलेली नसून, त्यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम अन्वये नोटीस देण्यात आली आहे.
या प्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस अंमलदार आदलिंग करीत आहेत. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक गणेश शिंदे यांच्या निदर्शनाखाली झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment