Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, February 9, 2026

SARA NEWS NETWORK


 सारा न्यूज नेटवर्क - 

वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया पुरस्कार प्राप्त दत्तगवई-संगीतविशारद - ज्योतिषपंडित दत्तसाक्षात्कारी श्री ज्ञानमाऊली यांच्या सुमधुर वाणीतून;

श्री दत्त स्वामी समर्थ मूर्ती प्राणप्रतिष्ठापने निमित्त संगीतमय श्री गुरुचरित्र पारायण.. 


सोलापूर :- सोलापुरातील सर्व गुरु भक्तांना दत्तभक्तांना एक अध्यात्मिक पर्वणीचा लाभ मिळणार आहे. श्री महालक्ष्मी सिद्धपीठ मंदिर राघवेंद्र नगर व राम नारायण चंडक विहार शिव बसव चौक. सैफुल सोलापूर येथे औदुंबर कल्पवृक्षाच्या छायेत  "श्री दत्त स्वामी समर्थ मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त" वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया पुरस्कार प्राप्त दत्तगवई-संगीतविशारद - ज्योतिषपंडित दत्तसाक्षात्कारी श्री ज्ञानमाऊली यांच्या सुमधुर वाणीतून श्री दत्तसांप्रदायातील कामधेनु म्हणजे श्री गुरुचरित्र या दिव्य ग्रंथाचे गायन आधारे पारायण होणार आहे.. कारण दत्तप्रभूना संगीतमय गायन अतिशय प्रिय असल्याने गुरुचरित्र गायनाचे जागतिक रेकॉर्ड श्री ज्ञान माऊली यांना प्राप्त आहे.. त्यांची सुस्वर दिव्य वाणी आणि मंगलमय सानिध्यात संगीतमय गुरुचरित्र गायनाचा पारायण सप्ताह संपन्न होणार आहे.


"दत्तप्रभूना गायन अतिशय प्रिय आहे तसे त्यांनी गुरुचरित्रात भक्तांना अभिवचन ही दिलेले आहे." 

"आणिक सांगेन एक खूण । गायनीं करी जो माझे स्मरण । त्याचे घरीं असे जाण । गायनप्रीति आम्हांसी ॥४०॥

नित्य जें जन गायन करिती । त्यांवरी माझी अतिप्रीति । तयांचे घरी अखंडिती । आपण असों अवधारा ॥४१॥

व्याधि न होय त्यांचे घरीं । दरिद्र जाय त्वरित दुरी । पुत्रपौत्र श्रियाकरीं । शतायुषी नांदतील ॥४२॥

ऐकतील चरित्र माझें जरी। वाचतील नर निरंतरी । लक्ष्मी राहे त्यांचे घरीं । संदेह न धरावा मनांत ॥४३॥"

(श्रीगुरूचरित्र अध्याय ५१ वा)


तरी विजापूर रोड- सैफुल- जुळे सोलापूर-सात रस्ता व सोलापुरातील इतर परिसरातील भाविक भक्तांनी या पारायणाचा लाभ घ्यावा.. माघ शुक्ल तृतीया शुक्र. दि. 20 फेब्रु. रोजी सकाळी दहा वाजल्यापासून वैदिक पद्धतीने विश्वकर्मा मंदिर निर्माण स्थापत्य शास्त्रानुसार अक्कलकोट संचलित श्री प्रसाद पंडित गुरुजींच्या मार्गदर्शनातून श्री दत्त स्वामी मूर्तीची प्रतिष्ठापना व इतर पूजा विधी संपन्न होणार आहेत.. पूजा विधि नंतर सर्व भक्तांना महाप्रसादाचा लाभ मिळणार आहे..

त्याच सोहळ्याचे औचित्य साधून शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी पासून संगीतमय गुरुचरित्र पारायणास सुरुवात होणार आहे.. दररोज सकाळी सात ते अकरा या वेळेत संगीतमय पारायण होणार आहे.. संगीतमय गुरुचरित्र गायन हा ज्ञानमाऊलींचा एकमेव द्वितीय उपक्रम आहे.. गुरुचरित्राचे अशा पद्धतीने पारायण संपूर्ण महाराष्ट्रात करणारे ते एकमेव दत्तभक्त आहेत..

गुरुचरित्र पारायणामुळे वास्तुदोष ग्रहदोष आणि पितृदोषाचे निराकरण होत असते. कुंडलीतील अशुभ ग्रह सुद्धा शुभ स्थितीत येतात.. म्हणून वर्षभरातून एक किमान एकदा तरी गुरुचरित्र पारायण करणे आवश्यक आहे.. या पत्रकार परिषदेस श्री भानुदास सूर्यवंशी, श्री संजय जाधव, श्री हनुमंत मोतीबने आणि सुरेश बिराजदार आदी उपस्थित होते


सोहळ्यात तन-मन-धनाने आपले योगदान द्यावे. गुरुचरित्र पारायण नोंदणी करिता संपर्क

श्री. दत्तात्रय लाळसंगी 9421060413

सौ पुष्पा जाधव 9158 754411

सौ दिपाली कुलकर्णी 8600866183


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment