Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, February 12, 2026

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त समर्पण दिन साजरा.. 

त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण करण्यात आले.. 


सोलापूर (प्रतिनिधी) :- प्रभाग क्र 23 दक्षिण पश्चिम मंडल सोलापूर शहर पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त समर्पण दिन साजरा करण्यात येत असून, आज प्रभाग क्रमांक 23 चे नगरसेवका सौ ज्ञानेश्वरी महेश देवकर (उपमहापौर) यांनी कोटणीस नगर भाग-2 येथे पंडित दीनदयाळजी उपाध्याय प्रतिमा पूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते व त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 






या कार्यक्रमास सोलापूर कृषीउत्पन्न बाजार समिती संचालक मनिष भैय्या देशमुख, शहर सरचिटणीस डॉ शिवराज सरतापे ,मंडल अध्यक्ष महेश देवकर,श्रीनिवास बुरुडकर, मयूर घुगे, वैशाली गुंड प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.व प्रभागातील नागरिक उपस्थित होते




याप्रसंगी उपस्थिती श्वेता होनमाने, प्रभाकर पडवळकर, संगना मलाबदे, कोळी आदी 

याप्रसंगी पंडितजींनी त्यांच्या आयुष्यात राष्ट्रसेवेसाठी केलेल्या कार्याची माहिती, नागरिकांना दिली व 70 वर्ष देशात सत्तेत असलेल्या काँग्रेस राजवटीत पंडितजीं यांच्यासारख्या थोर विचारवंत, राजकीय नेत्याचा इतिहास जनतेसमोर आणला गेला नाही, तो सर्व जनतेसमोर आपण घेऊन जावावे अशी विनंती केली.....पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! 🙏🌱


समाजसेवा, अंत्योदय आणि पर्यावरण संरक्षण या मूल्यांना अनुसरून हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला. 🌿

चला, स्मृती जपूया… निसर्ग वाढवूया!


सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment