Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Thursday, August 27, 2026

SARA NEWS NETWORK

सारा न्यूज नेटवर्क - 



 रविंद्र शिंदे सर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कराओके सिंगिंग कॉम्पिटिशनचे आयोजन.. 

जास्तीत जास्त गायकांनी सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन.. 

सोलापूर : - Natural Karaoke Studio च्या सौजन्याने रविंद्र शिंदे सर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कराओके सिंगिंग कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले आहे.


ही स्पर्धा रविवार, दि. ०६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत Natural Karaoke Studio, Saiful येथे होणार आहे.


संगीताची मैफल, आवाजाचा उत्सव आणि गाण्यांची जादू असा त्रिवेणी संगम या स्पर्धेत पाहायला मिळणार आहे. गायनाची आवड असणाऱ्या सर्व वयोगटातील कलाकारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.


बक्षिसांचे स्वरूप :

• प्रथम पारितोषिक : रु. ३१००/- रोख + ट्रॉफी • द्वितीय पारितोषिक : रु. २१००/- रोख + ट्रॉफी • तृतीय पारितोषिक : रु. ११००/- रोख + ट्रॉफी 

या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सर्व कलाकारांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी सहभाग फी फक्त रु. ३००/- ठेवण्यात आली आहे.


स्थळ :  22, मुक्त नगर, नॅचरल कराओके स्टुडिओ, सैफुल, विजापूर रोड, सोलापूर 


गायन करा... आपला आवाज दाखवा...! या आवाहनासह आयोजकांनी जास्तीत जास्त गायकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.


अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क :

रविंद्र शिंदे सर - 8888683222

विनायक बेनगी सर - 7020242740




No comments:

Post a Comment