सारा न्यूज नेटवर्क -
कोटणीस नगर येथे महापालिका परिवहन सेवेचा बस स्टॉप व्हावा; नागरिकांची मागणी..
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर महानगरपालिकेची परिवहन सेवा लवकरच सुरू होत आहे. यासाठी शहरात विविध ठिकाणी बस स्टॉप निश्चित करण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे.
त्याच अनुषंगाने विजापूर रोडवरील कोटणीस नगर, यामिनी नगर, नूतन प्रशाला आणि माशाळ वस्ती या भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून, या परिसरात ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने राहतात. या नागरिकांच्या सोयीसाठी कोटणीस नगर येथे बस स्टॉप मंजूर करण्यात यावा, अशी मागणी नंदनवन ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व स्थानिक नागरिकांनी राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांच्याकडे केली.
या मागणीची तात्काळ दखल घेत खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी महानगरपालिका आयुक्तांना पत्र दिले असून, दूरध्वनीवरून तशा सूचना देखील दिल्या आहेत.
यावेळी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. प्रकाश राठोड, नंदनवन ज्येष्ठ नागरिक संस्थेचे पदाधिकारी आणि कोटणीस नगरच्या सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभाताई जाधव यांनी कोटणीस नगर येथे बस थांबा व्हावा यासाठी पाठपुरावा करत आहे.


No comments:
Post a Comment