Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Saturday, October 3, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



पत्रकार कृती समितीच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन;

रेल्वे स्टेशन परिसरातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण.. 


सोलापूर :- पत्रकार कृती समितीच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त सोलापूर रेल्वे स्टेशनजवळील महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


यावेळी पत्रकार कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे, नितीन करजोळे, गिरमाल्ला गुरव, अशोक ढोणे, सिद्धाराम नंदर्गी, अमोल कुलकर्णी आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.



२ ऑक्टोबर – महात्मा गांधी जयंती


महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या तत्त्वांच्या माध्यमातून त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला व्यापक दिशा दिली. साधी राहणी, स्वावलंबन, स्वच्छता आणि सामाजिक एकोपा यावर त्यांनी विशेष भर दिला.


संयुक्त राष्ट्रसंघाने २ ऑक्टोबर हा ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ म्हणून घोषित केला आहे.


महात्मा गांधी जयंतीनिमित्त त्यांच्या सत्य, अहिंसा आणि मानवतेच्या विचारांना विनम्र अभिवादन! 🙏🌹🇮🇳



No comments:

Post a Comment