Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Saturday, October 3, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्याला कलेच्या माध्यमातून सलाम;

 चित्रकार विपुल मिरजकर यांची अनोखी कलाकृती.. 


सोलापूर - सोलापूरचे जिल्हाधिकारी श्री. S. Karthikeyan सर यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल आता कलेतून घेतली जात आहे. ग्राउंड लेव्हलवर जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत, त्यांच्या अडचणी समजून घेऊन तातडीने उपाययोजना करण्याच्या त्यांच्या प्रेरणादायी कार्यपद्धतीने सोलापूरकरांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.


त्यांच्या याच कार्याचा सन्मान करण्यासाठी सोलापूरचे प्रसिद्ध चित्रकार विपुल मिरजकर यांनी एक अनोखी कलाकृती साकारली आहे.



एकाच दोऱ्यापासून ४ फुटाची प्रतिकृती


विपुल मिरजकर यांनी जिल्हाधिकारी कार्तिकेन सर यांची ४ फूट उंचीची प्रतिकृती केवळ एका सिंगल धाग्यापासून (Single Thread Art) तयार केली आहे. ही कलाकृती साकारण्यासाठी त्यांना ३ दिवस, दररोज ७ ते ८ तास अथक परिश्रम घ्यावे लागले.


"समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेणे आणि त्यांना कलेच्या माध्यमातून सलाम करणे, ही एक कलाकार म्हणून माझी जबाबदारी आहे," अशी भावना चित्रकार विपुल मिरजकर यांनी व्यक्त केली.


ते पुढे म्हणाले, "Karthikeyan सर हे आजच्या विद्यार्थ्यांसाठी आणि युवा पिढीसाठी एक प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या कार्यातून प्रामाणिकपणा, लोकांशी जोडलेपण आणि समाजासाठी काम करण्याची भावना शिकायला मिळते."


या अनोख्या कलाकृतीच्या माध्यमातून त्यांनी 'Karthikeyan Sir, आपल्या कार्याला मनापासून सलाम आणि Thank You!' असे म्हणत कृतज्ञता व्यक्त केली आहे.


सध्या या कलाकृतीची सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून, एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या कार्याचा सन्मान कलेच्या माध्यमातून केल्याबद्दल चित्रकार विपुल मिरजकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.




No comments:

Post a Comment