Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Saturday, October 3, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



वन्यजीव सप्ताहानिमित्त स्मृती उद्यान येथे विद्यार्थ्यांची वनभ्रमंती व पर्यावरण जनजागृती कार्यक्रम;

लिटिल स्टार अकॅडमी, न्यू आरटीओ, विजापूर रोड, सोलापूर येथील विद्यार्थ्यांनचा उत्स्फूर्त सहभाग.. 

सोलापूर, दि. १ ऑक्टोबर २०२६ :


सामाजिक वनीकरण, वन विभाग, सोलापूर यांच्या वतीने वन्यजीव सप्ताहानिमित्त स्मृती उद्यान, सोलापूर येथे विद्यार्थ्यांसाठी वनभ्रमंती, पर्यावरण जनजागृती तसेच पक्षी व वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.


विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण, सोलापूर श्री. लक्ष्मण आवारे साहेब तसेच  श्रीमती शुभांगी जावळे मॅडम सहाय्यक वन संक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या उपक्रमामध्ये लिटिल स्टार अकॅडमी, B3, शिवाजी हाउसिंग सोसायटी, नियर न्यू आरटीओ, विजापूर रोड, सोलापूर येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना स्मृती उद्यानातील विविध वृक्ष, वनस्पती, पक्षी तसेच जैवविविधतेची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली.




यावेळी कर्मचारी श्री. राजकुमार कोळी यांनी विद्यार्थ्यांना निसर्गभ्रमंती घडवून आणत उद्यानातील विविध वृक्ष, वनस्पती, पक्षी, जैवविविधता व पर्यावरणीय महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांना निसर्गाचे निरीक्षण, वृक्षसंवर्धन आणि वन्यजीव संरक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच वनक्षेत्रपाल श्री. गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष नर्सरीमध्ये रोपांची निर्मिती व संगोपन कसे केले जाते, छोटी रोपे तयार करण्याची पद्धत तसेच रोपांच्या देखभालीबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली.


यावेळी वनक्षेत्रपाल श्री. गणेश पवार व श्री. सिद्धेश्वर सगरे लेखा पाल यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

तसेच विविध फळझाडांच्या फळांचे संकलन, बियाण्यांचे महत्त्व आणि बियाण्यांपासून नवीन रोपे तयार करण्याची प्रक्रिया याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

वन्यजीव व पक्षी छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वन्यजीव संरक्षण, पक्षी संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध छायाचित्रे, वृक्ष व वनस्पतींची माहिती उत्सुकतेने जाणून घेतली.




या कार्यक्रमास लिटिल स्टार अकॅडमीच्या संचालिका सौ. अबोली जाधव तसेच शिक्षक सौ. स्मिता शिंदे, सौ. स्मिता वरवडकर, सौ. पद्मा जैन, सौ. सुषमा पाटील, सौ. गायत्री वडगावकर व सौ. आशा गोलेकर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना निसर्गाच्या अधिक जवळ नेऊन ‘वृक्ष वाचवा, वन्यजीव वाचवा आणि पर्यावरणाचे संरक्षण करा’ हा संदेश देत वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.

सामाजिक वनीकरण,वन विभाग, सोलापूर



No comments:

Post a Comment