सारा न्यूज नेटवर्क -
'समर्पण'च्या गुजराती आवृत्तीला राहुल चव्हाणांच्या योगदानाची मोहोर
गुजरात विद्यापीठातील राष्ट्रीय सेमिनारमध्ये विशेष निमंत्रण; पंडित दीनदयाल उपाध्याय पुस्तकाच्या निर्मितीतील सहकार्याची नोंद - राहुल चव्हाणांचा सन्मान
सोलापूर (प्रतिनिधी) :- अहमदाबाद येथील गुजरात विद्यापीठाच्या श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात ३ सप्टेंबर २०२६ रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रेरणादायी जीवनकार्य, राष्ट्रवादी चिंतन आणि समर्पित व्यक्तिमत्वावर आधारित एकदिवसीय राष्ट्रीय सेमिनार उत्साहात पार पडला.
याच कार्यक्रमात लेखक चंदन कुमार लिखित 'समर्पण : दीनदयाल उपाध्याय' या पुस्तकाच्या गुजराती आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमासाठी तुळजापूर तालुक्यातील खुळजवाडी पाटील तांडा येथील रहिवासी, देशभक्ती और समाजसेवा फाउंडेशनचे राष्ट्रीय चेअरमन तथा भाजपाचे युवा नेते राहुल जी. चव्हाण (धाराशिव) यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते.
पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांचा, राष्ट्रनिष्ठेचा आणि सामाजिक कार्याचा परिचय व्यापक वाचकवर्गापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने 'समर्पण : दीनदयाल उपाध्याय' या पुस्तकाची गुजराती आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. या आवृत्तीच्या निर्मितीसाठी राहुल चव्हाण यांनी विशेष सहकार्य केले असून, त्यांच्या योगदानाची नोंद पुस्तकात करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांची उपस्थिती
गुजरात विद्यापीठाच्या श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात झालेल्या या राष्ट्रीय सेमिनारला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. यामध्ये खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला, दीनदयाल शोध संस्थान, दिल्लीचे अध्यक्ष, माजी खासदार, लेखक व सामाजिक-राजकीय चिंतक प्रा. डॉ. महेश चंद्र शर्मा, केंद्रीय विश्व हिंदू परिषद मार्गदर्शक मंडळाचे सदस्य धर्माचार्य महामंडलेश्वर अखिलेश्वर दासजी महाराज, अहमदाबाद महानगरपालिकेचे महापौर हितेश बारोट, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष भरत पंड्या, गुजरात विद्यापीठाचे कुलपती डॉ. जगदीशभाई जोशी, पुस्तकाचे लेखक चंदन कुमार तसेच राष्ट्रीय साधू समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष त्रिलोचनदासजी महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन गुजरात विद्यापीठाच्या राजनीतिशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले होते. सेमिनारमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेल्या एकात्म मानववादाच्या विचारांची, राष्ट्रनिर्मितीतील योगदानाची, सामाजिक समरसतेच्या भूमिकेची आणि त्यांच्या समर्पित जीवनकार्याची विविध मान्यवरांनी मांडणी केली.
राहुल चव्हाणांचे योगदान ठरले चर्चेचा विषय
'समर्पण : दीनदयाल उपाध्याय'च्या गुजराती आवृत्तीच्या निर्मितीसाठी राहुल चव्हाण यांनी केलेल्या विशेष सहकार्याचा पुस्तकात उल्लेख करण्यात आल्याने त्यांच्या योगदानाची विशेष चर्चा झाली. ग्रामीण आणि तांडावस्तीतील सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या राहुल चव्हाण यांनी सामाजिक कार्यासोबतच राष्ट्रविचार, समाजप्रबोधन आणि शैक्षणिक उपक्रमांना सातत्याने पाठबळ देण्याचा प्रयत्न केला आहे.
गुजरात विद्यापीठासारख्या नामांकित शैक्षणिक संस्थेत आयोजित राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमासाठी त्यांना विशेष निमंत्रण मिळणे आणि पुस्तकाच्या गुजराती आवृत्तीच्या निर्मितीत त्यांच्या योगदानाची अधिकृत नोंद होणे, ही खुळजवाडी पाटील तांडा, तुळजापूर तालुका आणि धाराशिव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत आहे.
"दीनदयालजींचे विचार समाजाला दिशा देणारे" - राहुल चव्हाण
यावेळी बोलताना राहुल चव्हाण म्हणाले, “पंडित दीनदयाल उपाध्यायजी यांचे जीवन हे राष्ट्रसेवा, समाजसेवा आणि समर्पणाचे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी मांडलेला एकात्म मानववाद हा केवळ राजकीय विचार नसून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास आणि समान संधी पोहोचविण्याची दिशा दाखविणारा विचार आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा परिचय अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे ही आजच्या काळाची गरज आहे.” ते पुढे म्हणाले, “'समर्पण : दीनदयाल उपाध्याय' या पुस्तकाची गुजराती आवृत्ती वाचकांपर्यंत पोहोचत असल्याचा मला विशेष आनंद आहे.”



No comments:
Post a Comment