Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Tuesday, September 1, 2026

SARA NEWS NETWORK

सारा न्यूज नेटवर्क - 



 मातोश्री गिरिजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात 'राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा'निमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात संपन्न ..


सोलापूर :- येथील मातोश्री गिरिजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) व जिल्हा अंधत्व व दृष्टीक्षीणता नियंत्रण सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्याचे (२५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर ) आयोजन करण्यात आले होते. 

*'द्या अंधांना दृष्टी, तेही पाहतील सृष्टी'* हा सामाजिक संदेश देत हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वासंती पांढरे मॅडम यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

या प्रसंगी नॅक समन्वयक प्रा. रेश्मा जाधव मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. 


कार्यक्रमा दरम्यान श्री.विकास लिंगराज यांनी उपस्थितांना नेत्रदानाचे महत्त्व, त्याचे नियम आणि कायदेशीर प्रक्रिया याविषयी सविस्तर माहिती दिली. मृत्यूनंतरही आपली दृष्टी इतर कोणाच्या आयुष्यात प्रकाश आणू शकते आणि एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना नवीन आयुष्य मिळू शकते, असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात स्पष्ट केले.

या जनजागृती मोहिमेत महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हातात माहितीपत्रके व नेत्रदान संकल्पाचे फॉर्म्स घेतले आणि समाजात जनजागृती करण्याचा निश्चय केला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थिनींनी नेत्रदानाचा संकल्प केला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी मोलाचे सहकार्य केले.

No comments:

Post a Comment