सारा न्यूज नेटवर्क -
महावीर रणखांबे यांची सारा न्यूज नेटवर्कच्या दक्षिण सोलापूर प्रतिनिधीपदी निवड
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्ते ओळखपत्र, नियुक्ती पत्र व पेन देऊन सत्कार
सोलापूर (प्रतिनिधी) : - गेल्या तीन वर्षांपासून सारा न्यूज नेटवर्कने सोलापूर, पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक घडामोडींचा वेगवान आढावा घेत समाजातील वंचित, पीडित घटकांचा आवाज प्रशासन दरबारात आपल्या पोर्टल व चॅनेलच्या माध्यमातून बुलंद केला आहे. अन्यायग्रस्त व अत्याचारग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सारा न्यूज नेटवर्क नेहमीच रोकठोक भूमिका बजावत आले आहे.
या पार्श्वभूमीवर सारा न्यूज नेटवर्कच्या दक्षिण सोलापूर प्रतिनिधीपदी महावीर रणखांबे यांची निवड करण्यात आली आहे.
नवनियुक्त प्रतिनिधी महावीर रणखांबे यांचा सत्कार नुकताच सोलापूरच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांना सारा न्यूज नेटवर्कचे ओळखपत्र, नियुक्ती पत्र, बुके व पेन देऊन गौरविण्यात आले व पुढील पत्रकारितेच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी सारा न्यूज नेटवर्कचे संपादक डॉ. राम हुंडारे, पर्यावरण मित्र डॉ. मनोज देवकर, दैनिक दिव्य मराठीचे दक्षिण सोलापूर प्रतिनिधी अमोघसिद्ध लांडगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


No comments:
Post a Comment