सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर: राज्यसभा खासदार डॉ. प्रा. ज्योतीताई वाघमारे यांचा नागरी आरोग्य केंद्राच्यावतीने सत्कार..
सोलापूर, :- दि. ६ - शिवसेना (हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे - उपमुख्यमंत्री ना. एकनाथ भाई शिंदे पक्ष) च्या राज्य प्रवक्त्या आणि भारताच्या सर्वोच्च सभागृह समजल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार डॉ. प्रा. ज्योतीताई वाघमारे यांचा सत्कार सोलापूर महानगरपालिकेच्या कोणापुरे चाळ नागरी आरोग्य केंद्राच्यावतीने करण्यात आला.
शासकीय विश्रामधाम (डाक बंगला), सोलापूर येथे आयोजित या सत्कार सोहळ्यात आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तथा जन आरोग्य समितीचे सेक्रेटरी मा. डॉ. श्री. पल्लोलू वाय. एच. सर आणि सर्व स्टाफच्या वतीने त्यांना हार्दिक अभिनंदन पत्र देऊन पुष्पगुच्छ, शाल देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी डॉ. पल्लोलू सर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सोलापूरच्या कन्या असलेल्या डॉ. ज्योतीताई वाघमारे यांची राज्यसभा खासदार पदी आणि केंद्र सरकारच्या केंद्रीय महिला व बाल कल्याण समितीच्या नूतन सदस्य पदी निवड होणे ही सोलापूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातून शिक्षण घेऊन पीएचडी पर्यंतचा प्रवास करून संसदेत पोहोचलेल्या त्यांच्या कार्याचा गौरव आहे.
सत्काराला उत्तर देताना खासदार डॉ. ज्योतीताई वाघमारे यांनी आरोग्य केंद्राच्या सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. सोलापूरच्या आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या महिला व बाल कल्याण विकास योजनांचा लाभ थेट गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासन त्यांनी दिले.
याप्रसंगी आरोग्य केंद्राच्या वतीने नागरी आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आणि केंद्राला सदिच्छा भेट देण्याबाबतचे निवेदनही खासदार महोदयांना देण्यात आले.
या कार्यक्रमास कोणापुरे चाळ नागरी आरोग्य केंद्रातील सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments:
Post a Comment