Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Saturday, September 5, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचा वर्धापन दिन उत्साहात साजरा.


सोलापूर :- भारत देशातील पहिली ISO 9001:2015 नामांकन प्राप्त व महाराष्ट्र राज्यातील वीज क्षेत्रातील अग्रगण्य असलेली विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन चा ४९ वा वर्धापन दिन बिजली भवन, जुनी मिल आवार, मुरारजी पेठ, सोलापूर येथे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

       संघटनेचे ज्येष्ठ सभासद लक्ष्मीपुत्र बिराजदार यांच्या हस्ते वार्ता फलकाचे पूजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माझी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार व संघटनेचे माजी केंद्रीय अध्यक्ष दिवंगत संतोष घाडगे यांना यांना दोन मिनिट स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.







       संघटनेचे पुणे प्रादेशिक संघटक सुनिल काळे, बारामती परिमंडळ अध्यक्ष उत्तरेश्वर स्वामी, ज्येष्ठ सभासद रविंद्र तुळजापूरकर, शुकुर शेख आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

       याप्रसंगी पुणे प्रादेशिक संघटक सुनिल काळे, बारामती परिमंडळ अध्यक्ष उत्तरेश्वर स्वामी, सोलापूर मंडल उपाध्यक्ष अनिलकुमार बनसोडे, सचिव अजीम चौधरी, श्रीराम सलवदे, मयुर गवते, बालाजी वराडे, रामास्वामी कुंभार, अशोक निंबर्गी, संजय बसरगी, जनार्दन काकी, एम. एम. करजगीकर, मनोज कलशेट्टी, प्रशांत बामणे, दत्तात्रय पवार, रविंद्र तुळजापूरकर, कृष्णा कासगुंडे, संजय फताटे, लक्ष्मीपुत्र बिराजदार, शुकुर शेख, निलेश गावडे, गुंडाप्पा बनसोडे, दत्ता कंबळे यांच्यासह संघटनेचे इतर सभासद व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




No comments:

Post a Comment