Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Tuesday, September 1, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा :

 सहायक संचालक गणेश सोनटक्के यांना राज्यपालांच्या हस्ते उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार


सोलापूर, प्रतिनिधी (प्रा. दत्तात्रय महादेव बनसोडे ) :-

सोलापूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक मा. श्री. गणेश सोनटक्के साहेब यांना महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल मा. श्री. जिष्णूदेव वर्मा यांच्या हस्ते 'उत्कृष्ट अधिकारी' म्हणून गौरविण्यात आले आहे.


सोलापूर जिल्ह्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा एकूण 99 आश्रम शाळा आहेत. सदर शाळा विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या (VJNT) विद्यार्थ्यांसाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविल्या जातात. या शाळांना महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून अनुदान दिले जाते, तसेच इतर शैक्षणिक साहित्य व मूलभूत सोयी सुविधा शासनाकडून पुरविल्या जातात.


याच विभागामार्फत वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती मुक्त वसाहत योजना, पीएम घरकुल योजना, तसेच शासकीय मुलांचे व मुलींचे वसतिगृह चालविले जातात. या विभागाकडून VJNT, OBC, SBC प्रवर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देखील दिली जाते.


सोनटक्के साहेबांनी या सर्व योजना अत्यंत प्रभावीपणे व पारदर्शकपणे राबवून राज्यात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या याच उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यपाल महोदयांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.


हा सन्मान म्हणजे सोलापूरच्या शिरपेचात रोवलेला मानाचा तुरा असून, सर्वच स्तरातून श्री. गणेश सोनटक्के साहेबांचे हार्दिक अभिनंदन व कौतुक होत आहे.





No comments:

Post a Comment