सारा न्यूज नेटवर्क -
चर्मकार समाज विकास मंडळ सोलापूर तर्फे 13 सप्टेंबर रोजी आदर्श शिक्षक पुरस्कार व गुणवंत सत्कार सोहळा..
सोलापूर :- चर्मकार समाज विकास मंडळ, सोलापूर यांच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून आदर्श शिक्षक पुरस्कार 2026, गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि मान्यवर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
समाजातील (फक्त चर्मकार समाज बांधवांसाठी) शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी नामांकन दाखल करण्याची अंतिम मुदत 6 सप्टेंबर 2026 आहे.
नामांकनासाठी लिंक : https://forms.gle/8raCu8frNw8Y7S1S8
तसेच शैक्षणिक वर्ष 2025-26 अंतर्गत दहावी, बारावी उत्तीर्ण, उच्च विद्या विभूषित आणि कला, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणवंतांचा सत्कार सोहळा होणार आहे. यासाठी किमान दहावीला 90 टक्के व बारावीला 80 टक्के गुण असणे अनिवार्य आहे.
नाव नोंदणी लिंक : https://forms.gle/1Lq5wu7uU36WE1ng6
पुरस्कारासाठी निवड समिती मार्फत अंतिम नावे जाहीर केली जातील. याच कार्यक्रमात समाजात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचाही सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचा तपशील :
दिनांक - 13 सप्टेंबर 2026, सकाळी 10:30 वाजता
स्थळ - शिवस्मारक सभागृह, नवी पेठ परिसर जवळ, शिंदे चौक, सोलापूर.
या कार्यक्रमास सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
आयोजक व निवड समिती :
मुख्य निमंत्रक - श्री राजशेखर जेऊरकर
निवड समिती प्रमुख - श्री मल्हारी बनसोडे - 9822802702
निवड समिती सदस्य -
प्रा. डॉ. दत्तात्रय हरवाळकर - 8087533253
श्री रेवणसिद्ध व्हनमराठे - 9423394180
प्रा. डॉ. कल्लप्पा व्हनहुवे - 9850170642
श्री अंबादास वाघमारे - 8275458109
श्री राजेंद्र कांबळे - 9011115002
सौ. संगीता हत्याळीकर - 9689590511
सौ. ज्योती वंजारी - 8421162292
सर्व निमंत्रक - चर्मकार समाज विकास मंडळ, सोलापूर.


No comments:
Post a Comment