Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Sunday, November 8, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



📰 आमदार सुभाष बापू देशमुख साहेब यांची उपमहापौर कार्यालयास सदिच्छा भेट;

 विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा.!


सोलापूर : - सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. सुभाष बापू देशमुख साहेब यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर मा. सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली.


यावेळी उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी आमदार सुभाष बापू देशमुख साहेब यांचे शाल व रोप देऊन सन्मानपूर्वक स्वागत व सत्कार केला.


या भेटीदरम्यान शहराच्या विकासाशी निगडित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सोलापूर शहरातील नागरी समस्या, विकासकामे तसेच नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात विविध मुद्द्यांवर विचारविनिमय झाला.




या सदिच्छा भेटीदरम्यान सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.


सोलापूरच्या विकासासाठी एकजुटीने, समन्वयाने आणि जनहिताला प्राधान्य देत कार्य करण्याचा संकल्प!




No comments:

Post a Comment