Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Tuesday, November 10, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



पोलीस जनतेत रंगणार क्रिकेटचा सामना.!

 ‘पोलीस जनता चषक’ स्पर्धेत विजेत्यांना २१ हजारांचे प्रथम पारितोषिक.

मंद्रूप प्रतिनिधी : दक्षिण सोलापूर


पोलीस आणि जनता यांच्यातील स्नेहपूर्ण संबंध अधिक दृढ व्हावेत, परस्परांमध्ये विश्वास, एकोपा आणि मैत्रीची भावना वाढीस लागावी, या उद्देशाने मंद्रूप पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण यांच्या वतीने भव्य ‘पोलीस जनता चषक क्रिकेट स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे आयोजन दि. १२ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मंद्रूप पोलीस ठाणे मैदानावर करण्यात आले आहे.


या क्रिकेट स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे विजेत्या संघांसाठी ठेवण्यात आलेली भरघोस पारितोषिके. 

स्पर्धेतील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघाला २१ हजार रुपये, 

द्वितीय क्रमांकाच्या संघाला १५ हजार रुपये, 

तर तृतीय क्रमांकाच्या संघाला ८ हजार रुपये रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.



या स्पर्धेत परिसरातील एकूण १८ संघ सहभागी होणार असून, विविध संघांमध्ये क्रिकेटचा चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे. पोलीस आणि पत्रकार व नागरिक यांच्यातील संवाद वाढविणे, युवकांना क्रीडाक्षेत्रात प्रोत्साहन देणे तसेच खेळाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा निर्माण करणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.


‘खेळातून मैत्री, मैत्रीतून विश्वास आणि सहकार्यातून सामाजिक एकोपा’ हा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. पोलीस प्रशासन केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यापुरते मर्यादित नसून सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांतही जनतेसोबत असल्याचा सकारात्मक संदेश या स्पर्धेतून मिळणार आहे.



या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी क्रीडाप्रेमी नागरिक, युवक आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंद्रूप पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण यांच्या वतीने करण्यात आले आहे.




No comments:

Post a Comment