सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर महानगरपालिकेकडून शुभ दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा;
‘जलसंपत्ती जपूया, निसर्गाशी नाते घट्ट करूया’
सोलापूर : - दिवाळीच्या निमित्ताने सोलापूर महानगरपालिकेने शहरवासीयांना शुभेच्छा देताना यंदा पर्यावरणपूरक आणि जलसंवर्धनावर भर देणारी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. ‘जलसंपत्ती जपूया, निसर्गाशी नाते घट्ट करूया!’ या घोषवाक्यासह महापालिकेने शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या परिसरातील विहिरी, तलाव, बांध आणि जलस्रोत स्वच्छ ठेवूया, त्यांचे पुनरुज्जीवन करूया आणि जलसमृद्ध भविष्य घडवूया, असे आवाहन करण्यात आले आहे.
महापालिकेने नागरिकांना चार महत्त्वाचे संदेश दिले आहेत -
१. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा!
कमी धूर व कमी आवाजाचे ‘ग्रीन फटाके’ वापरा. वायू प्रदूषण टाळा. दिवे, पणत्या व विद्युतरोषणाईने दिवाळी उजळवा.
२. गरजेपुरतेच पाणी वापरा!
नळ गळती त्वरित दुरुस्त करा. पावसाचे पाणी साठवा (रेन वॉटर हार्वेस्टिंग) करा. पाण्याचा पुनर्वापर करा.
३. कचरा उघड्या ठिकाणी टाकू नका!
कचरा नेहमी कचरापेटीतच टाका. ओला व सुका कचरा वेगळा करा. परिसर स्वच्छ व सुंदर ठेवा.
४. झाडे लावा, झाडे जगवा!
प्रत्येक नागरिकाने एक तरी झाड लावावे. लावलेल्या झाडांची नियमित देखभाल करावी. हिरवाई वाढवा, शहरांचा पर्यावरणीय समतोल राखा


No comments:
Post a Comment