Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Tuesday, November 10, 2026

SARA NEWS NETWORK

सारा न्यूज नेटवर्क - 



 कोनापुरे चाळ नागरी आरोग्य केंद्राकडून मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया रोगाचे लोकवस्तीत सर्वेक्षण संपन्न.. 


सोलापूर :- सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत कोनापुरे चाळ नागरी आरोग्य केंद्र, वर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तथा जनआरोग्य समितीचे सचिव डॉ. पल्लोलु सर यांच्या वैद्यकीय आरोग्य पथकाने आज दि. 8/11/2026 रोजी प्रभाग क्रमांक 15 अंतर्गत कोनापुरे चाळ, फॉरेस्ट, बुद्ध विहार व तुरड गल्ली या भागात लोकवस्तीत सर्वेक्षण केले.


राष्ट्रीय कीटकजन्य (डास) नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हे सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया व हत्तीपाय रोगासारख्या आजारांच्या प्रतिबंधासाठी घरोघरी फिरून नागरिकांना आरोग्य शिक्षण देण्यात आले.





प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत घरगुती कामासाठी वापरण्यात येणारे पाणी बॅरेल, टाकी, सेप्टिक टँकमध्ये साठवून ठेवल्यानंतर झाकणयुक्त सुरक्षित ठेवण्याबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच आठवड्यातून एक दिवस कोरडा दिन पाळण्याचे, टाकीत अळ्या होऊ नयेत म्हणून गप्पी मासे, गोडे तेल व टेमीफॉस द्रावण वापरण्याचे आणि वैयक्तिक व परिसरात स्वच्छता राखण्याचे समुपदेशन करण्यात आले.


सदर वैद्यकीय आरोग्य पथकात डॉ. पल्लोलु - वैद्यकीय अधिकारी, श्रीमती सिद्धिकी - स्टाफ नर्स, मोईन शेख - एमपीडब्ल्यू, श्रीमती वैजयंती कांबळे उपस्थित होत्या.


नागरिकांनी डासोत्पत्ती स्थाने नष्ट करून सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी आरोग्य पथकाकडून करण्यात आले.




No comments:

Post a Comment