Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Sunday, November 8, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



सोलापूर रेल्वे स्टेशन रोडवर तीन पत्तीचा डाव.!

 पहाटेपासून खुलेआम जुगार सुरू असल्याचा आरोप


सोलापूर | प्रतिनिधी


सोलापूर शहरातील रेल्वे स्टेशनसमोरील रोडवर पहाटे चार वाजल्यापासून तीन पत्तीचा डाव सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, रस्त्यावरच तीन टेबल लावून हा प्रकार सुरू असल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे चार वाजल्यापासून काही लोक रेल्वे स्टेशन रोडवर तीन टेबल लावून तीन पत्तीचा खेळ खेळत असल्याचे सांगण्यात येत आहे. या डावामध्ये खेळणारे आणि खेळ लावणारे काही लोक एकाच गटातील असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.


रेल्वे स्टेशनवर येणारे आणि परगावाहून प्रवासासाठी आलेले नागरिक या डावाच्या आकर्षणाला बळी पडत असल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीला पैशांच्या आमिषाने खेळायला बसवले जाते आणि एखादी व्यक्ती जिंकू लागली, तर तिला दमदाटी करून अधिक वेळ खेळण्यास भाग पाडले जात असल्याचा गंभीर आरोप आहे.


इतकेच नव्हे, तर खेळात पैसे हरले किंवा जिंकले, तरीही संबंधित व्यक्तींना पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांच्या आर्थिक फसवणुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, सार्वजनिक रस्त्यावर टेबल लावून असा तीन पत्तीचा डाव सुरू असल्यास संबंधितांवर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार?


रेल्वे स्टेशन परिसरात पहाटेपासून सुरू असल्याचा आरोप असलेल्या या प्रकाराची पोलिसांनी दखल घेऊन चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


सोलापूर रेल्वे स्टेशन रोडवरील या कथित जुगाराच्या डावाला आता पोलीस प्रशासन कधी लगाम घालणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





No comments:

Post a Comment