सारा न्यूज नेटवर्क -
डिजिटल न्यायक्रांतीकडे महत्वाची वाटचाल — ई-कोर्ट प्रशिक्षण शिबिर यशस्वीरीत्या संपन्न..
सोलापूर :- e-Committee, माननीय सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या मार्फत ECT_12_2025 या विशेष ई-कोर्ट प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 10 जानेवारी 2026 (शनिवार) रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, सात रस्ता, सोलापूर येथे करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण कार्यक्रम सकाळी 9:30 वाजता उत्साहपूर्ण वातावरणात सुरू झाला.
या प्रशिक्षणामध्ये ई-फायलिंग, ई-कोर्ट प्रणाली, ऑनलाईन न्यायप्रक्रिया, तांत्रिक सुविधांचा परिणामकारक वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले. हा कार्यक्रम ज्युनिअर व सीनियर वकिल तसेच वकिलांचे लिपिक यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरला.
कार्यक्रमात मास्टर ट्रेनर म्हणून
👉 अॅड. किरण घाडगे
👉 अॅड. किरण अंकुशराव
यांनी प्रभावी मार्गदर्शन करत ई-कोर्ट प्रणालीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले.
कार्यक्रमादरम्यान
🎤 सूत्रसंचालन – अॅड. बसवराज हिंगमिरे (सेक्रेटरी, सोलापूर बार असोसिएशन)
🙌 प्रमुख पाहुण्यांचा परिचय – अॅड. अरविंद देडे (खजिनदार, सोलापूर बार असोसिएशन)
स्वागत-सत्कार
🌷 अॅड. किरण घाडगे – अध्यक्ष अॅड. बाबासाहेब जाधव यांच्या हस्ते
🌷 अॅड. किरण अंकुशराव – उपाध्यक्ष अॅड. रियाज शेख यांच्या हस्ते संपन्न झाला.
सुमारे 200 ते 250 वकील बंधू-भगिनी व त्यांचे क्लर्क मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशिक्षणाचा लाभ घेतला. उपस्थितांसाठी अल्पोपहार, जेवण तसेच स्टेशनरी यांची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्यक्ष उपस्थित राहिलेल्या सदस्यांना आकर्षक ऑफिस बॅग भेट देण्यात आली.
🌟 विशेष उल्लेख
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक श्री खमीतकर, श्री लालसंगी तसेच ‘आय.टी./सिस्टीम विभागातील इतर कर्मचारीवर्गांनीही मोलाचे परिश्रम घेतले. त्यांच्या सक्रिय सहकार्यामुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत सुरळीतरीत्या पार पडला.
तसेच, मागील प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्यांनाही या शिबिरात सहभाग घेण्याची संधी देण्यात आली आणि त्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
सदर प्रशिक्षण शिबिरामुळे सोलापूर न्यायालयीन परिसरामधील वकिल व त्यांच्या लिपिकांमध्ये ई-कोर्ट व डिजिटल न्यायप्रणालीबाबत जागरूकता, कौशल्य आणि आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाली.
📌 एकूणातच सदर प्रशिक्षण शिबिर अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि उल्लेखनीय यशासह संपन्न झाले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे






No comments:
Post a Comment