सारा न्यूज नेटवर्क -
बुध्दीबळ विश्व - पी आर चेस वर्ल्डचा नियान ठरला सोलापूर जिल्ह्यातील इतिहासात सर्वात लहान फिडे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडू तसेच हिमांशू भरत व्हनगावडे (१४४६) याला जागतिक बुद्धिबळ संघटने कडून अरेना कॅंडिडेट मास्टर ची पदवी बहाल.
सोलापूर :- पी आर चेस वर्ल्ड अकॅडमीमध्ये शिकत असलेल्या नियान कंदीकटला याने सोलापूर जिल्ह्यातील इतिहासात सर्वात लहान फिडे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त बुध्दीबळ खेळाडू होण्याचा मान पटकावला आहे.* फक्त ७ वर्ष ३ महिने व २३ दिवस वय वर्ष असलेल्या या चिमुकल्या खेळाडूने बुद्धिबळ विश्वात आपले कौशल्य दाखवून स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. नियानने सोलापूरातील जी एच रायसोनी खुल्या फिडे मानांकनप्राप्त जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडूंना पराभवाचा धक्के दिले. त्यामध्ये कुलकर्णी वेदांत कुशल (१४८४), हिमांशू भरत व्हनगावडे (१४५९), बाळासाहेब संभाराव मस्के (१४५७) यांना नमवित तर अनन्या चंद्रकांत उलभगत (१४६७) हिच्या सोबत बरोबरी करीत *१५०६* असे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करून सोलापुरातील सर्वात लहान खेळाडू होण्याचा विक्रम तयार केला.
तसेच *हिमांशू भरत व्हनगावडे (१४४६) याला जागतिक बुद्धिबळ संघटने कडून अरेना कॅंडिडेट मास्टर ची पदवी प्राप्त झाली.* बुधवार दिनांक ३१/१२/२०२५ पर्यंत त्याच्या ९ वर्षांच्या वयोगटात फिडे ऑनलाइन अरेना मध्ये भारतात पाचवा तर जागतिक क्रमवारीत पंचेचाळीस वा क्रमांक पटकावला आहे. हिमांशूने ८४८ गेम्स खेळले तर १६४२ कोडे सोडवली व ४२ स्पर्धा जिंकून हा सन्मान पटकावला आहे. तसेच ओम निरंजन ने जलदगती आंतरराष्ट्रीय मानांकना मध्ये १० गुणांची वाढ केली आहे.
पी आर चेस वर्ल्ड अकॅडमीमध्ये ऑफलाइन तसेच ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारात प्रशिक्षण देण्यात येते. भारतासह ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, दुबई, इंग्लंड, नॉर्वे, सौदी अरेबिया व श्रीलंका या देशातही प्रशिक्षण देण्याचे काम पी आर चेस वर्ल्ड अकॅडमी करीत आहे. नियान, हिमांशू आणि ओम यांना आंतरराष्ट्रीय पंच व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर पवन राठी सर, वरिष्ठ राष्ट्रीय पंच व बुद्धिबळ प्रशिक्षिका रोहिणी तुम्मा मॅडम आणि राज्य पंच व बुद्धिबळ प्रशिक्षिका जयश्री कोंडा मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन आणि त्यांच्या शाळेतील शिक्षक व त्यांचे पालक यांनी नियान आणि हिमांशू यांचं बुद्धिबळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कौतुक केले आणि यांच्या उज्वल भविष्यातील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment