सारा न्यूज नेटवर्क -
प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांचा वाढदिवस अनेक मान्यवरांची उपस्थिती पत्रकारांची तोबा गर्दी..
सोलापूर (प्रतिनिधी) :- गेल्या नऊ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार सुरक्षा समितीचे नूतन प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी वेगवेगळे जिल्हे तालुके पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता केवळ पत्रकारांसाठी आपले उभं आयुष्य खर्ची घातले असून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांसाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करून पाठपुरावा करत असून यशवंत पवार हे पत्रकार सुरक्षा समिती च्या माध्यमातून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना आरोग्य योजना विमा योजना पत्रकारांसाठी घरकुल योजना ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बसमधून मोफत प्रवास पत्रकारांच्या चारचाकी वाहनास टोल मधून सूट राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय जाहिराती यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्राना पूर्वी प्रमाणे जाहिराती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल प्रकरणी वरिष्ठ अधिकारी मार्फत स्वतंत्र चौकशी पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण या सह राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती चे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार अतिशय आक्रमक व प्रभावीपणे काम करत असून 6 जानेवारी (पत्रकार दिन ) रोजी यशवंत पवार यांचा वाढदिवस म्हणजे खऱ्या अर्थाने पत्रकार दिन म्हणावा लागेल.
यशवंत पवार यांचा वाढदिवस पत्रकार सुरक्षा समिती व पत्रकार बांधवांच्या वतीने सोलापूर येथील समाज कल्याण हॉल या ठिकाणी मोठया आनंदात साजरा करण्यात आला.
या वाढदिवस कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पत्रकार सुरक्षा समितीचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे होते या कार्यक्रमास दैनिक कर्मयोगी चे संपादक संजय पवार दैनिक शिव निर्णय चे संपादक अनिल शिराळकर दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद तिसरी आँख मानव अधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे शिवभोजन चालक मालक संघटना चे अध्यक्ष अनिल भिंगारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली
यावेळी नूतन प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांचा मानाची शाल टोपी पुष्पगुछ पुष्पहार तसेच गुलाब पुष्प ची मनसोक्त उधळण करून साजरा करण्यात आला यावेळी पत्रकारांची तोबा गर्दी होती अनेकांनी यशवंत पवार यांना वाढदिवसाच्या तसेच उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख
सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे उपाध्यक्ष अमर पवार सरचिटणीस बंडू तोडकर जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष झाकीर शेख पंढरपूर जिल्हा उपाध्यक्ष बाहुबली जैन दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष अमित राठोड सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी उपाध्यक्ष अल्ताफ शेख कार्याध्यक्ष राजू वग्गू शहर कार्यकारी अध्यक्ष वसीम राजा बागवान समन्वयक लक्ष्मण सुरवसे सचिव रमेश दग्गारी प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी मोहोळ तालुका अध्यक्ष सागर पवार उपाध्यक्ष शुक्राचार्य शेंडेकर तालुका कार्याध्यक्ष सूरज जगताप तालुका संघटक महादेव शेवाळे तालुका खजिनदार प्रवीण फराटे तालुका समन्वयक कैलास सूळ तालुका सदस्य समाधान गोडसे वैजिनाथ बिराजदार सतीश गडकरी जेष्ठ पत्रकार सैफन शेख इम्तियाज अक्कलकोटकर युसूफ पिरजादे खलील बागवान कबीर शेख दैनिक अबतक चे संपादक प्रसाद जगताप डॉ. अन्वर होटगीकर संतोष म्हेत्रे राजू गुरव बाबा काशीद दर्याप्पा कांबळे महेश मेटकरी मुजम्मिल काखंडकीकर बाशाभाई मुजावर जेष्ठ पत्रकार अशोक ढोणे युनूस आत्तार या सह अन्य पत्रकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते यावेळी पत्रकार बांधवांनी तोबा गर्दी केली केल्याने समाज कल्याण हॉल खचाखच भरला होता.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे




No comments:
Post a Comment