सारा न्यूज नेटवर्क -
मंद्रूप पोलिस ठाणेच्या वतीने औज (मं) येथे वृक्षारोपण, आदर्श पोलीस पाटील व शिक्षक सन्मान सोहळा संपन्न..
दक्षिण सोलापूर:- समाजामध्ये पर्यावरण संवर्धन, आदर्श पोलीस पाटील व गुणवंत शिक्षकांचा गौरव व्हावा या उद्देशाने वृक्षारोपण, आदर्श पोलीस पाटील व शिक्षक सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज रोजी दि. ०३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता औज मंद्रूप येथे करण्यात आले होते.
सदरचा कार्यक्रम श्री. अतुल कुलकर्णी (भा.पो.से), पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. शुभहस्ते वृक्षारोपण व सन्मान सोहळा पार पडला. तसेच कार्यक्रमास
श्री. संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर विभाग, सोलापूर ग्रामीण, श्री. राहुल आत्राम, परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री. अब्दुलकादर समशेर अली बडे जागीरदार, संस्थापक जय हिंद एज्युकेशन फाउंडेशन तसेच अध्यक्ष चॉईस कॉलेज ऑफ आर्ट्स अॅण्ड कॉमर्स, पुणे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न) यांच्या वतीने करण्यात आले होते.
या सोहळ्यात पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले असून, ग्रामीण भागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आदर्श पोलीस पाटील व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमास नागरिक, शिक्षक, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे


No comments:
Post a Comment