सारा न्यूज नेटवर्क -
जनविकास क्रांती सेना पक्षाच्या हरकतीमुळे २६२ मतदारांना हक्काचे मतदान बजावण्याची संधी...
सोलापूर :-
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भी प्रभाग 12 मधील 262 मतदारांना आपल्या हक्काच्या उमेदवारास मतदान करण्याची संधी जनविकास क्रांतीसेना पक्षाने हरकती नोंदवल्यामुळे प्राप्त झाली असल्याची माहिती जनविकास क्रांतिसेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
सोलापूर महानगरपालिका सन 2025 - 26 सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत प्रभाग 12 मधील विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्यासह 262 मतदारांची नावे मतदारांचा अनुक्रमांक 6327 ते अनुक्रमांक 6588 पर्यंत ची नावे प्रभाग क्रमांक 21 मध्ये नोंदणी करण्यात आली होती. सदर बाब निदर्शनास येताच जनविकास क्रांतिसेनेच्या वतीने 01 डिसेंबर 2025 रोजी वरील बाबतीत हरकत नोंदविली. तरीही सदर 262 मतदारांची नावे दुरुस्ती न करताच अंतिम मतदार यादी प्रसिद्धी करण्यात आली त्यामुळे 262 मतदारांचे नावे प्रभाग 21 मध्येच राहिली. याबाबत सोलापूर महानगरपालिका आयुक्त व महानगरपालिका निवडणूक प्रमुख श्री ओंम्बासे यांना दि.19. 12. 2025 रोजी याबाबतीत पुनश्चन निवेदन देण्यात आले. त्यावरून अंतिम यादीत हरकत घेतलेल्या 262 मतदारांची नावे प्रभाग क्रमांक 21 मधून प्रभाग क्रमांक 12 मध्ये पुरवणी मतदार यादीत समावेश करण्यात आला. मतदार यादीतील प्रभाग 21 मधील यादीतील मतदारांचा अनुक्रमांक 6327 ते अनुक्रमांक 6,588 पर्यंत ची नावे पुनश्चा प्रभाग 21 मधून 12 मध्ये नोंदविण्यात आली. यावरून प्रभाग 12 मधील 262 मतदारांना आपल्या हक्काचा नगरसेवक निवडण्याचा हक्क प्राप्त झाला आहे. यामुळे सर्व मतदार बंधू भगिनींनी जनविकास क्रांतिसेनेच्या या कामकाजाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे .
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment