Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, January 6, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

कल्याणराव काळे भाईजान उपसरपंच दारफळ गावडी यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.. 


सोलापूर :- कल्याणराव काळे भाईजान उपसरपंच दारफळ गावडी यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे, यावेळी उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून बाळराजे पाटील, इंद्रजीत पवार, संभाजी दडे, अनंतजी सुभेदार, विनायक सुतार, जीवन दादा साठे,तुषार दादा साठे,केशव माने, सतीश सुर्वे, अनिल शितोळे, शाहीर पवार, बापू गाडेकर, महेश कदम, विष्णू उंबरे यांच्यासह आदी खेळाडू असंख्य संख्येने उपस्थित होते,

छत्रपती शिवाजी राजे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन सोहळा पार पडला. 

या या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 41 हजार 44 अविनाश दादा मार्तंडे ,द्वितीय पारितोषिक 31 हजार 44 अनंत सुभेदार सर, तृतीय पारितोषिक 21046 बापू गाडेकर आजिनाथ पवार ,चतुर्थ पारदर्शक 12044अनिल जी दारेगोळ व्यंकटेश्वरा कंट्रक्शन ,तसेच अन्य काही बक्षीस ठेवण्यात आलेले आहेत.



या स्पर्धेसाठी के के भाईजान दारफळ गावडी, ओंकार सीसी बाळे ,समर्थ सी सी बाळे ,जगदंब सी सी, डी एस बॉस केगाव, जय किसान ॲग्रो कौठाळी, एस पी कळमन, समर्थ सी सी नरोटेवाडी, कुलदैवत वडाळा, आरसीसी नान्नज, यशराज पडसाळी, आय पी टायगर मार्डी या संघाने भाग घेतला असून या स्पर्धा लीग पद्धतीने होत आहेत.

खेळाडूंना स्पर्धा परीक्षेच्या उद्दिष्टाने पोलीस भरतीच्या माध्यमातून , कौशल्यातून आपल्या तालुक्यातील मुले सोलापुरातच नव्हे तर जगभरात नाव करावे हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे असे मत कल्याणराव काळे उपसरपंच यांच्या आहे.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment