सारा न्यूज नेटवर्क -
लहान मुलीवर बलात्काराच्या गुन्हयातील आरोपीस २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा.
मुंबई :- निर्मलनगर पोलीस ठाणे, हददीत शिवालीक कंपाउंड झोपडपटटी, हुसैन टेकडी, खार पूर्व, मुंबई येथे राहणारे फिर्यादी महिलेच्या घराजवळच राहणारा इसम नामे मनुवर गेणू मलिक, वय ५२ वर्षे, याने दिनांक १८/१२/२०२२ रोजी सायंकाळच्या सुमारास फिर्यादी यांची ०९ वर्षाची लहान मुलगी हि घराबाहेर खेळत असताना तिच्या मैत्रीणीबरोबर खेळत खेळत शेजारी राहणारा इसम नामे मनुवर गेणू मलिक, वय ५२ वर्षे, याचे घरामध्ये गेली असताना व तिच्या सोबतच्या मैत्रीणी घरामध्ये लपल्या असताना आरोपीने सदर लहान मुलगी एकटी आहे असे समजून घराला आतून कडी लावून सदर लहान मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर सदर मुलगी तिच्या घरामध्ये घाबरून रडत बसलेली असताना मुलीच्या आईने मुलीकडे विचारपूस केली असता मुलीने तिच्या आईस सदरचा घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने निर्मलनगर पोलीस ठाण्यास येवून दिलेल्या तक्रारीवरून निर्मलनगर पोलीस ठाणे गु.र.क. ११९६/२०२२, कलम ३७६,३५४,३४१ भा.द. वि. सह कलम ४,८,१२ बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम २०१२ अन्वये दिनांक १९/१२/२०२२ रोजी आरोपी नामे मनुवर गेणू मलिक, वय ५२ वर्षे, रा.ठी. शिवालीक कंपाउंड झोपडपटटी, शिवाजी सेवा मंडळाच्या जवळ, हुसैन टेकडी, खार पूर्व, मुंबई याचेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
नमूदप्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्हयाचा तपास पो.नि. एस.टी. चव्हाण यांचेकडे देण्यात आला होता. त्यांनी नमूद गुन्हयात आरोपीस दिनांक १९/१२/२०२२ रोजी अटक केली. अटक केल्यापासून आरोपी हा न्यायालयीन कोठडीमध्येच होता. तसेच नमूद गुन्हयाच्या अनुषंगाने गुन्हयातील बळित बालिकेबरोबर खेळण्यास सदर ठिकाणी गेलेली तिची मैत्रीण तसेच इतर साक्षीदार यांचेकडे सखोल तपास करून त्यांचे जबाब नोंदवून गुन्हयाच्या तपासामध्ये सबळ पुरावा प्राप्त करून पो.नि. एस.टी. चव्हाण यांनी आरोपीविरूध्द मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्याचा स्पेशल केस कमांक २१८/२०२३ असा होता.
सदर केसची सुनावणी मा. अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती बी. एस. गरे, कोर्ट कमांक ६०, विशेष सत्र न्यायालय, मुंबई यांचे न्यायालयात दिनांक ०६/०१/२०२६ रोजी झाली. गुन्हयातील फिर्यादी, बळित बालिका तसेच सदर घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार बालिका इतर साक्षीदार व तपासी अधिकारी यांच्या मा. न्यायालयात साक्ष होवून मा. न्यायालयाने साक्ष ग्राहय धरून मा. विशेष सत्र न्यायालयाने आरोपीस लहान मुलीवरील बलात्काराच्या गुन्हयामध्ये आरोपी नामे मनुवर गेणू मलिक यांस २० वर्षे सश्रम कारावास व रू. ५०००/- दंड व दंड न भरल्यास दोन महिने शिक्षा अशी शिक्षा सुनावली आहे.
सदर गुन्हयाच्या सुनावणीदरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रमेश वाघ, पो.नि. (गुन्हे), युवराज खाडे हे केसच्या सुनावणीवर सतत लक्ष ठेवून होते. व त्याअनुषंगाने कोर्ट पैरवी अधिकारी व कोर्ट कारकून यांना केसच्या अनुषंगाने वेळोवेळी सूचना देवून मार्गदर्शन करीत होते. त्याप्रमाणे सत्र न्यायालयाचे कोर्ट पैरवी अधिकारी पोउपनि संदिप जरांडे, पो.ह.क. ६०६१/प्रदिप आगवणे, गुन्हे मदतनीस पो.ह.क. ९८०६३८/श्रीकृष्ण सावळे, कोर्ट कारकून पो.ह.क. ००३९१/धर्मेन्द्र धनु, मपोशिक. ११३६७०/कल्पना जाधव, पो.शि.क. ०९३८७/प्रीतम कांबळे यांनी वेळोवेळी मुदतीत गुन्हयातील साक्षीदार, पंच यांना वेळेवर न्यायालयात हजर ठेवून व गुन्हयाच्या साक्षीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केल्याने गुन्हयातील आरोपीस २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा झालेली आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment