सारा न्यूज नेटवर्क -
वळसंग पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या खुनाच्या गुन्ह्याचा तत्काळ उलगडा – अवघ्या ५ तासांत आरोपी अटकेत..
वळसंग :- वळसंग पोलीस ठाणे हद्दीत खुनाची गंभीर घटना घडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती घेत घटनास्थळ संरक्षित केले.
मयताचा मृतदेह तात्काळ शासकीय रुग्णालयात रवाना करून फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या सहाय्याने पंचनामा करण्यात आला. प्राथमिक तपासादरम्यान मिळालेल्या तांत्रिक व प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली.
सदर गुन्ह्यातील आरोपींना अवघ्या पाच तासांच्या आत अटक करण्यात आली. या संपूर्ण कारवाईदरम्यान कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न देता परिस्थिती अतिशय संवेदनशील व संयमित पद्धतीने हाताळण्यात आली.
वळसंग पोलीस ठाण्याच्या या तत्पर, कार्यक्षम कामगिरीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे करीत आहेत.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment