Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, January 6, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

नॅब सोलापूरचे संस्थापक अध्यक्ष मा.प्रकाशजी यलगुलवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक पर्वणी ! 


सोलापूर : - नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, जिल्हा शाखा सोलापूरचे संस्थापक अध्यक्ष मा.प्रकाशजी यलगुलवार यांच्या वाढदिवसानिमित्त साजऱ्या होत असलेल्या आनंदोत्सवाच्या निमित्ताने चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी एक आगळीवेगळी बौद्धिक पर्वणी आयोजित करण्यात आली. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.



                 विज्ञान,गणित,इतिहास,मराठी,हिंदी व इंग्रजी या विषयांसह विद्यार्थ्यांच्या सामान्यज्ञानावर आधारित विविध, रंजक आणि विचारप्रवर्तक प्रश्नांची मांडणी करण्यात आली होती. या प्रश्नांनी विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली. विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने व सहजतेने दिली. उद्बोधक तसेच मनोरंजनात्मक प्रश्नांमुळे संपूर्ण प्रांगणात चैतन्यपूर्ण व आनंदी वातावरण निर्माण झाले होते.



                 या प्रश्नमंजुषेचे सूत्रसंचालन प्रशालेचे शिक्षक श्री.पांडुरंग राऊत यांनी आपल्या खुमासदार आणि प्रभावी शैलीत केले.स्पर्धेचे परीक्षक व गुणलेखक म्हणून श्री. मुकुंद शेटे सर आणि श्री. अस्लम मुलानी सर यांनी जबाबदारी पार पाडली.

           या कार्यक्रमाला श्री.सुरेश बटगेरी,प्रा.चंद्रकांत जाधव,सांस्कृतिक विभाग प्रमुख जोतिबा काटे, प्रा.अर्चना अडसूळ, प्रा.श्रावण इंगळे, श्री.कासिम मुजावर सर तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

              ज्ञान,उत्साह आणि आनंद यांचा सुरेख संगम साधणारी ही बौद्धिक पर्वणी विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरली.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment